देशांतर्गत स्पर्धांबाबत बीसीसीआयचा कौल
भारतीय मंडळाने संघटनांना पर्याय देताना रणजी स्पर्धेस 67 दिवस पुरेसे आहेत, तर मुश्ताक अली स्पर्धेस 22 दिवस आणि विजय हजारे स्पर्धेस 28 दिवस असे सांगितले आहे. या स्पर्धा मर्यादित सहा शहरांत घेताना त्यां ठिकाणी तीन स्टेडियम आहेत, याकडे लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर एलीट विभागात पाच गट असतील. त्यात प्रत्येकी संघ असतील, तर प्लेट विभागात आठ संघ असतील.
मुंबई : कोरोनाचा फटका बसल्यामुळे देशांतर्गत मोसमात कोणत्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन योग्य होईल, याबाबत भारतीय क्रिकेट मंडळाने संलग्न संघटनांचे मत मागवले आहे आणि त्याच वेळी या स्पर्धा देशात सहा ठिकाणी जैवसुरक्षित वातावरणात होणार असल्याचे सांगितले आहे.
AUSvsIND : हार्दिक पांड्यानं घेतला अंगलट येईल असा धाडसी निर्णय
भारतीय मंडळाने संघटनांना पर्याय देताना रणजी स्पर्धेस 67 दिवस पुरेसे आहेत, तर मुश्ताक अली स्पर्धेस 22 दिवस आणि विजय हजारे स्पर्धेस 28 दिवस असे सांगितले आहे. या स्पर्धा मर्यादित सहा शहरांत घेताना त्यां ठिकाणी तीन स्टेडियम आहेत, याकडे लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर एलीट विभागात पाच गट असतील. त्यात प्रत्येकी संघ असतील, तर प्लेट विभागात आठ संघ असतील.
ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का जायबंदी; मैदान सोडून जावे लागले हॉस्पिटलात
बीसीसीआयचे पर्याय
1) केवळ रणजी करंडक स्पर्धा
2) केवळ मुश्ताक अली ट्वेंटी 20 स्पर्धा
3) रणजी करंडक तसेच मुश्ताक अली स्पर्धा
4) मुश्ताक अली स्पर्धा तसेच विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा