ICC नं भुवनेश्वर कुमारला केलं सन्मानित

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

लागोपाठ तिसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडूने पटकावला पुरस्कार

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं आयसीसीच्या Player of the Month या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.  मागील काही महिन्यांपासून आयसीसीने प्रत्येक महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला Player of the Month पुरस्काराने गौरवण्याचे ठरवले. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यातही भारतीय खेळाडूनंच या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. पहिल्या महिन्यात ऋषभ पंत आणि दुसऱ्या महिन्यात आर. अश्विन याने नाव कोरलं होतं. 

यंदाच्या वर्षापासून आयसीसीने हा नवा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पंत यानं या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. तर इंग्लंडविरोधात कसोटी मालिकेत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अश्विन यानं दुसर्या महिन्यात पुरसकारावर नाव कोरलं होतं. आता तिसऱ्या महिन्यातही भारतीय खेळाडूनेच Player of the Month या पुरस्कारावर नाव कोरलं. 

मार्च महिन्यातील पुरस्कारासाठी भुवनेश्वरव्यरितिक्त राशिद खान आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटपटूचा सिन विलियम्स यांना आयसीसीने  नामांकन दिले होते. इंग्लंडविरोदात झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील कामगिरीच्या आधारावर भुवनेश्वरनं या पुरस्कारावर नाव कोरलं. इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भुवनेश्वरनं २२.५० च्या सरासरीने ६ विकेट्स चटकावल्या होत्या. तर टी२० मालिकेत २८.७५ च्या सरासरीने ४ विकेट्स घेतल्या होत्या.
 


​ ​

संबंधित बातम्या