वडिलांच्या हिंदूविरोधी वक्तव्याबद्दल युवीनं बर्थडे दिवशी मागितली माफी

सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 12 December 2020

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. शतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर त्यांनी एक भाषण केले होते. यात त्यांनी देशातील हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणात #ArrestYograjSingh ट्रेंडही पाहायला मिळाला होता.  

Birthday Boy Yuvraj Singh Apologises For His Father Remark भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी, असे मत त्याने व्यक्त केले आहे. याशिवाय त्याने आपले वडील योगराज सिंह यांचे विधान निराशजनक असल्याचेही म्हटले आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्यासाठी युवीने एक संदेश लिहिला आहे. बर्थडे आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा एक क्षण असतो. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बर्थडे साजर करण्याची इच्छा नाही, असा उल्लेख त्याने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे. तोडगा निघू शकत नाही असा कोणताच मुद्दा नसतो, या वाक्याचा आधार घेत सरकारने शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करायला हवी, असे युवराज सिंगने म्हटले आहे. शेतकरी म्हणजे देशाची लाइफ लाइन आहे. त्यांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे. चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा निकाली लागू शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. 

हिटमॅन फिट है! टेस्ट पास झालेला रोहित प्लाइट कधी पकडणार?

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. शतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर त्यांनी एक भाषण केले होते. यात त्यांनी देशातील हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणात #ArrestYograjSingh ट्रेंडही पाहायला मिळाला होता.  त्यांचे हे वक्तव्य निराशजनक होते, असे युवीने म्हटले असून यासंदर्भातही त्यांनी माफी मागितली आहे.


​ ​

संबंधित बातम्या