जाणून घ्या महिला क्रिकेटमधील 'राणी'बद्दलच्या काही खास गोष्टी
भारतीय महिला क्रिकेटला एक विशेष उंची प्राप्त करुन देणाऱ्या मिताली राजचा आज जन्म दिवस. याच निमित्ताने मिताली राज संदर्भातील जाणून घेऊयात मिताली राजत्या खास फोटोसह काही खास गोष्टी
भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी असलेले नाव. भारतीय महिला क्रिकेटला एक विशेष उंची प्राप्त करुन देणाऱ्या मिताली राजचा आज जन्म दिवस. याच निमित्ताने मिताली राज संदर्भातील जाणून घेऊयात मिताली राजत्या खास फोटोसह काही खास गोष्टी
-3 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेल्या मिताली राजचा जन्म एका तमिळ कुटुंबियात झाला.
-वयाच्या दहाव्या वर्षांपासून तिने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
- 1997 मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेसाठी तिच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यावेळी ती अवघ्या 14 वर्षांची होती. फायनल लिस्टमध्ये तिचे नाव दिसले नव्हते.
-1999 मध्ये मितालीने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-2017 मध्ये रंगलेल्या महिला विश्वचषकात मिताली राजने सातत्यपूर्ण सात अर्धशतके झळकावली होती. हा एक अनोखा विक्रमच तिने नोंदवला होता.
-क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिताली राजच्या नावे सर्वाधिक धावांची नोंद आहे. वनडेत तिने 189 डावात 6,888 धावा केल्या आहेत. या रेकॉर्डमुळेच तिला क्रिकेटच्या मैदानातील लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखले जाते.
-वर्ल्ड कप स्पर्धेत 1000 धावा करणारी मिताली राज भारताची पहिली आणि एकमेव फलंदाज आहे. इतर खेळाडूंचा विचार केल्यास असा पराक्रम पाच जणींनी केला आहे.
-क्रिकेटच्या मैदानात आपल्या धमाकेदार फलंदाजी आणि नेतृत्वाने ओळखली जाणारी मिताली राज वाचन आणि भरतनाट्यम हे दोन छंदही जोपासते.पद्मश्री, अर्जून अवार्डने सन्मानित करुन भारत सरकारने लेडी तेंडुलकरला सन्मानित देखील केले आहे.
-2003 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. तर 2017 मध्ये मितालीला पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आले.
-मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर या दिग्गज खेळाडूंनंतर मिताली राजच्या आयुष्याचा प्रवास देखील चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मितालीच्या भूमिकेत दिसणार आहे.