मालिका जिंकण्याची धवनच्या संघाला संधी
अर्जुन रणतुंगाने दुय्यम संघ म्हणून भारतीय संघाला हिणवले खरे, पण शिखर धवनच्या या संघाला श्रीलंकेला पहिल्या सामन्यात लोळवले. यजमानांचा हा संघ सावरायच्या आत दुसरा धक्का देत मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाला उद्या मिळणार आहे.
कोलंबो - अर्जुन रणतुंगाने दुय्यम संघ म्हणून भारतीय संघाला हिणवले खरे, पण शिखर धवनच्या या संघाला श्रीलंकेला पहिल्या सामन्यात लोळवले. यजमानांचा हा संघ सावरायच्या आत दुसरा धक्का देत मालिका जिंकण्याची संधी भारतीय संघाला उद्या मिळणार आहे.
तीन एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना उद्या होत आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केले. श्रीलंकेच्या संघातील काही खेळाडू इंग्लंडमधून मर्यादित षटकांची मालिका खेळून आलेले आहेत, पण मे महिन्याच्या सुरुवातीस आयपीएल स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू रविवारी प्रथमच सामना खेळले तरीही त्यांनी केलेला अफलातून खेळ भारताची क्षमता सिद्ध करणारा ठरला.