श्रीलंकेत खेळणाऱ्या कृणाल पंड्याला कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा दुसरा ट्वेन्टी-२० सामना एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आला आहे.

कोलंबो - शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा दुसरा ट्वेन्टी-२० सामना एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आला आहे. मात्र अजून काही खेळाडू बाधित झाल्यास उर्वरित मालिका रद्द करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ट्वेन्टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी आणि तिसरा व अखेरचा सामना गुरुवारी होणार होता. आता सर्व काही व्यवस्थित असेल, तर बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवसांत दोन सामने होतील; परंतु कृणाल पंड्या कोरोनाबाधित झाल्यावर त्याच्या संपर्कात आठ जण आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

कृणालला कोरोनाली लागण झाल्यामुळे सर्वच खेळाडूंचे विलगीकरण करण्यात आले आहे. या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्याच्या निकालावर उर्वरित सामन्यांचे भवितव्य असेल, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

सूर्यकुमार, पृथ्वीचे काय?
इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघात कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांची निवड झाल्याचे बीसीसीआयने कालच जाहीर केले होते. हे दोघेही श्रीलंकेत भारतीय संघासोबत आहेत रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ते खेळलेही होते. ते इंग्लंडला कधी रवाना होणार, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.


​ ​

संबंधित बातम्या