कर्फ्यूमध्ये पिज्जा मागवणे पडले 50 हजाराला; क्रिकेटपटूची फसवणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 April 2021

कर्फ्यूमध्ये पिज्जा मागवणे पडले महागात; क्रिकेटपटूला 50 हजारांचा गंडा

विजय हजारे चषकात मध्य प्रदेश क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या विक्रांत सिंह भदौरिया याची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.  कोरोना कर्फ्यूमध्ये ऑनलाइन पिज्जा मागवणं विक्रांतला चांगलेच महागात पडलं आहे. विक्रांतच्या खात्यामधून तब्बल 49 हजार 996 रुपये गेलेच शिवाय पिज्जाही मिळाला नाही.  

ग्वालियरमध्ये शिंदे छावनीमध्ये राहणारा विक्रांत भदौरिया भारताच्य अंडर-19 संघाचा सदस्यही होता.  क्रिकेटर विक्रांत भदौरिया याने डोमिनोजवर ऑनलाइन पिज्जा मागवायचा विचार केला होता.  दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रांत भदौरियासोबत 15 एप्रिल रोजी ऑनलाइन फसवणूक झाली. विक्रांतने इंटरनेटवर डोमिनोज पिज्जा सेंटरचा कस्टमर केअर नंबर शोधला. त्या क्रमांकावर फोन करुन चीज पिज्जा ऑर्डर दिला.  

पिज्जाची बुकिंग झाल्यानंतर त्याच क्रमांकावरुन ऑनलाइन पेमेंटची रिक्वेस्ट आली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक अॅप डाउनलोड झालं अन् खात्यातून 50 हजार लपांस झाले. ऑनलाइन फसवून झाल्यानंतर विक्रांत यानं सायबर क्रायममध्ये तक्रार दाखल केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या