Night Curfew त मुंबईतील नाईट पार्टी नडली, सुरेश रैनावर दाखल झाला गुन्हा
मुंबईतील ड्रॅगन प्लाय नावाच्या एका पबमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पार्टी सुरु होती. याप्रकरणात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Night Curfew in Mumbai : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या विरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील ड्रॅगन प्लाय नावाच्या एका पबमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पार्टी सुरु होती. याप्रकरणात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात रैनाचाही समावेश होता. नियमाचे उल्लंघन करुन पार्टीत सामील झालेल्यांवर 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटर सुरेश रैनाशिवाय, गायक गुरु रंधवा, सुजैन खान ही मंडळी देखील पार्टीत सहभागी झाली होती. मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन प्लाय क्लबमध्ये दुबईसह अन्य ठिकाणावरुन आलेले लोक पार्टीत सहभागी झाल्याचे समजते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर काही मंडळी मागच्या दाराने पसार झाली. जवळपास 34 जणांवर याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू घ्यावा''
15 ऑगस्ट 2020 मध्ये रैनाने धोनीसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यासोबत आयपीएल स्पर्धेसाठी दुबईला जाऊन स्पर्धेपूर्वीच माघारी घेतल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली होती.