झम्पावर 2500 डॉलरचा दंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा फिरकीपटू ऍडम झम्पावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने एका सामन्याची बंदी घातली आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा फिरकीपटू ऍडम झम्पावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने एका सामन्याची बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवण्यात येत असलेल्या बिग बॅश टी-ट्वेन्टी लीग स्पर्धेत गैरवर्तणूक केल्याबद्दल ऍडम झम्पावर कारवाई करण्यात आलेली आहे. सामन्याच्या दरम्यान, ऍडम झम्पाने चुकीची भाषा वापरल्याने त्याच्यावर एका सामन्याची बंदी आणि दंड देखील ठोठावण्यात आला आहे. बिग बॅश टी-ट्वेन्टी लीग मध्ये ऍडम झम्पा मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळतो. 

AUSvsIND : कांगारूंनो सावधान; हिटमॅनचे इंजिन सुरु झाले आहे 

मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात 16 व्या षटकात ऍडम झम्पा गोलंदाजी करत असताना, सिडनी थंडर्सचा फलंदाज कॉलम फर्ग्युसनने एक चोरटी धाव घेतली. त्यानंतर ऍडम झम्पाने अपशब्द वापरला. आणि यावेळी त्याने म्हटलेले सर्वकाही स्टंपच्या माईक मध्ये ऐकू आले. याचाच आधार घेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऍडम झम्पावर लेव्हल एकचे दोषी ठरवत कारवाई केली आहे. आणि त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालतानाच, त्याला 2500 डॉलरचा दंड देखील  ठोठावला आहे.  

दरम्यान, आतापर्यंतच्या बिग बॅश लीग स्पर्धेत ऍडम झम्पाने दमदार कामगिरी केली आहे. ऍडम झम्पाने सात बळी टिपलेले आहेत. तर भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेत देखील ऍडम झम्पाने चांगली खेळी केली होती. भारतासोबतच्या टी-ट्वेन्टी मालिकेत त्याने तीन विकेट्स मिळवले होते. तर एकदिवसीय मालिकेत झम्पाने चार भारतीय फलंदाजांना बाद केले होते.       
      

 


​ ​

संबंधित बातम्या