हे काय बरोबरी करणार? एकट्या विराटचा पगार पाकिस्तान संघाएवढा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 April 2021

कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचं A+ श्रेणीतील स्थान कायम ठेवले. या करारानुसार तिघांना वर्षाला सात कोटी रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाने  (BCCI) खेळाडूंसोबतच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा केली. यात अ +, अ, ब आणि क अशा चार श्रेणीमध्ये तब्बल २८ खेळांडूचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचं A+ श्रेणीतील स्थान कायम ठेवले. या करारानुसार तिघांना वर्षाला सात कोटी रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे. विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना मिळणारे वार्षिक मानधन पाकिस्तान संघाइतकं आहे. याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. 

बीसीसीआय खेळाडूला किती मानधन देतं -
अ + श्रेणीमधील खेळाडूंना प्रत्येकी सात कोटी, अ श्रेणीमध्ये असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी पाच कोटी, ब श्रेणीमध्ये असणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी तीन कोटी तर क श्रेणीतील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये दिले जातात.... 

पीसीबीकडून खेळाडूंना मिळणारं मानधन -
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या करारानुसार ग्रेड ए च्या खेळाडूंना 11 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजे 5.20 लाख भारतीय रुपये) पगाराच्या रूपात देते. या व्यतिरिक्त पाकिस्तान बोर्ड ग्रेड बी च्या खेळाडूंना 7.50 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजे 3.54 लाख भारतीय रुपये) देते. याशिवाय सी श्रेणीतील खेळाडूंना पगाराच्या रुपात बोर्ड 5.50 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजेच 2.60 लाख भारतीय रुपये) देते. पाकिस्तान बोर्डाने श्रेणी ए प्रकारात 3 खेळाडू, श्रेणी ब प्रकारात 9 खेळाडू आणि सी श्रेणीत 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. 

पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंना मिळणारं मानधन एकत्र केलं तर विराट कोहलीला मिळणाऱ्या मानधनाइतकं होतं. पाकिस्तान संघाच्या सर्व खेळाडूंचं मानधन सात कोटी 4 लाख इतकं होतेय. आणि एकट्या विराट अथवा रोहितचं मानधन 7 कोटी इतकं आहे.  याशिवाय आयपीएलमधून मिळणारं मानधन वेगळेच. आरसीबीकडून विराट कोहलीला वर्षाला 17 कोटी रुपयांचं मानधन मिळतं तर मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला 15 कोटीं रुपयांचं मिळतं. पाकिस्तान सुपर लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएसएलमधील सर्वात महागडा खेळाडू २ कोटी रुपयांचा आहे. 


​ ​

संबंधित बातम्या