‘अंपायर्स कॉल’ कायम रहाणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 April 2021

‘बॉल ट्रॅकिंग’च्या तंत्रज्ञानात अजून अचुकता नसल्यामुळे अंपायर्स कॉलचे अधिकार कायम ठेवले आहे, असे कुंबळे यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : भारत-इंग्लंड मालिकेतून वादाचा मुद्दा ठरलेला ‘अंपायर्स कॉल’ कायम ठेवण्याचा निर्णय आयसीसीच्या क्रिकेट समितीने घेतला आहे. मात्र त्याच वेळी डीआरएसमध्ये तीन बदल केले आहेत. अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट समितीने वादग्रस्त ठरत असलेल्या ‘अंपायर्स कॉल’ निर्णयात बदल करावा की नाही याचा उहापोह केला आणि मैदानावरील पंचांचे अधिकार कायम ठेवले. पायचीतच्या निर्णयाबाबत हा प्रश्‍न उद्भवत असतो. ‘बॉल ट्रॅकिंग’च्या तंत्रज्ञानात अजून अचुकता नसल्यामुळे अंपायर्स कॉलचे अधिकार कायम ठेवले आहे, असे कुंबळे यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. 

1) पायचीतच्या निर्णयबाबत रिव्ह्यू करताना यष्टींच्या दोन्ही बाजूस तसेच यष्टींच्या वर चेंडू किती प्रमाणात लागला हे अंपायर्स कॉलचा निर्णय देताना लक्षात घेतले जायचे पण आता हा नियम चेंडू यष्टींच्यावर किती लागला हे लक्षात घेतले जाणार नाही.
2) पायचीतच्या निर्णयाचा रिव्ह्यू घेताना फलंदाजांनी तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे की नाही, याची विचारणा प्रतिस्पर्धी खेळाडू पंचांकडे करू शकतात. 

नटराजनची सुंदर ड्राइव्ह; आनंद महिंद्रांना दिलं खास रिटर्न गिफ्ट

3) तोकडी धावबाबात (शॉर्ट रन) निर्णय घेताना मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात.

असे तीन महत्वाचे बदल कुंबळे यांच्या क्रिकेट समितीने घेतले आहेत. तसेच कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसल्यामुळे चेंडूला लाळ लावण्याची बंदी कायम असेल. अतिरिक्त डिआरएससह यजमान देशांतील पंच वापरण्याची लवचिकता कायम ठेवण्यात आली आहे.

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाच षटकांच्या फलंदाजी पॉवर प्लेचा निर्णय रद्द करण्यात आला तसेच सर्व टाय सामन्यांचे निकाल आता सुपर ओव्हरमध्ये लावण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या