डेव्ह व्हिटमोर नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

श्रीलंकेच्या संघाला 1996 मध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या डेव्ह व्हिटमोर यांची नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेमणूक झाली आहे.

श्रीलंकेच्या संघाला 1996 मध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या डेव्ह व्हिटमोर यांची नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेमणूक झाली आहे. डेव्ह व्हिटमोर हे भारतीय स्थानिक क्रिकेट मधील बडोदा संघाचे प्रशिक्षक म्हणून रुजू होणार होते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनाच्या काळात नियमावली लागू करताना 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना नियुक्त न करण्याचे सांगण्यात आले होते. 

AUS vs IND 1st Test Day 2 : टीम इंडिया फ्रंटफूटवर आली, पण...

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू असलेले 66 वर्षीय डेव्ह व्हिटमोर यांची नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेमणूक झाल्याची माहिती नेपाळच्या क्रिकेट मंडळाने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.  डेव्ह व्हिटमोर हे पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघ अशा अनेक संघांचे प्रशिक्षक होते.     

डेव्ह व्हिटमोर एक अनुभवी प्रशिक्षक असून, 1996 मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यश मिळवून दिले होते. याशिवाय 2008 मध्ये ते अंडर-19 भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. आणि याच वेळी भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अंडर-19 वर्ल्डकप जिंकला होता. याशिवाय डेव्ह व्हिटमोर हे काउंटी टीम लँकशायरच्या प्रशिक्षकपदीही होते. व लँकशायरच्या संघाने त्यावेळी दोनदा नॅशनल लीग आणि नेटवेस्ट ट्रॉफीत बाजी मारली होती.      


​ ​

संबंधित बातम्या