पंचांच्या बगलेत करणार डिओड्रंट जाहिरात
कोरोनामुळे अनेक खेळांचे संयोजक उत्पन्नाची नवी साधने शोधत आहेत. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग संयोजकांनी पंचांच्या बगलेत डिओड्रंट उत्पादकांच्या बोधचिन्हासाठी जागा करून दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रेक्सोना या डिओड्रंट उत्पादकांशी करार केला. त्यानुसार देशांतर्गत स्पर्धेच्या वेळी बोधचिन्ह पंचांच्या दोन्ही बगलेत असेल. षटकाराची खूण होताना दोन्ही बोधचिन्हे दिसतील; तर बाद, बाय याची खूण होताना एक दिसेल.
सिडनी - कोरोनामुळे अनेक खेळांचे संयोजक उत्पन्नाची नवी साधने शोधत आहेत. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग संयोजकांनी पंचांच्या बगलेत डिओड्रंट उत्पादकांच्या बोधचिन्हासाठी जागा करून दिली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रेक्सोना या डिओड्रंट उत्पादकांशी करार केला. त्यानुसार देशांतर्गत स्पर्धेच्या वेळी बोधचिन्ह पंचांच्या दोन्ही बगलेत असेल. षटकाराची खूण होताना दोन्ही बोधचिन्हे दिसतील; तर बाद, बाय याची खूण होताना एक दिसेल.
ऑस्ट्रेलियातील कडक उन्हात पंचांना सलग सहा तास काम करावे लागते. त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही हा करार केला आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. ही जाहिरात मोहीम होबर्ट ह्युरीकेन आणि सिडनी सीझर्स यांच्यातील सामन्याद्वारे सुरू करण्यात आली.
ट्वेंटी २० मुळे क्रिकेटचे मार्केंटिग वाढले आहे, नव्या कल्पना येत आहेत. नव्या जाहिरात संकल्पनेमुळे पंचांचे अथक प्रयत्न अधोरेखीत होतील. आता प्रत्येक विकेट, षटकार, लेग बाय, बाय यांचे महत्त्व वाढणार आहे, अशी टिप्पणी केली जात आहे.
बुटांच्या सोलवर जाहिरात
पंचांच्या काखेतील जाहिरात संकल्पना नवी आहे, पण व्यावसायिक बॉक्सिंग लढतीच्या वेळी बुटाच्या सोलवर जाहिरात देण्याचा प्रयोग झाला होता. माईक टायसन आणि ज्युलियन फ्रान्सिस लढतीच्या वेळी लंडनमधील एका वर्तमानपत्राने फ्रान्सिसच्या सोलवर जाहिरात दिली. फ्रान्सिस लढतीत पाचवेळा पडल्याने जाहिरातीचा उद्देश सफल झाला होता.
Edited By - Prashant Patil