दशकातील टी-ट्वेन्टी संघात धोनी नाही; आकाश चोप्राने निवडला अजब कॅप्टन     

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अन्य क्रिडा स्पर्धांसह क्रिकेटचा देखील बराचसा वेळ वाया गेला.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी अन्य क्रिडा स्पर्धांसह क्रिकेटचा देखील बराचसा वेळ वाया गेला. मात्र त्यानंतर कोरोनाची खबरदारी घेत जैव-सुरक्षित वातावरण निर्माण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरवात झाली आहे. त्यानंतर आता वर्षाच्या आणि दशकाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने दशकातील सर्वोत्कृष्ट टी -ट्वेन्टी क्रिकेटमधील प्लेयिंग इलेव्हनची निवड केली आहे. आकाश चोप्राने आपल्या संघामध्ये फक्त तीन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. मात्र त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपल्या संघात स्थान दिलेले नाही. 

युवीचे षटकार पुन्हा पाहायला मिळणार; T20 तून कॅमबॅक करण्याचे संकेत

आकाश चोप्राने निवड केलेल्या आपल्या या संघात क्रिकेट जगातील सर्वात छोट्या प्रकारात 1000 षटकार खेचणाऱ्या ख्रिस गेलचा देखील समावेश केलेला नाही. टी -ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलने केलेल्या आहेत. याव्यतिरिक्त, टी-ट्वेन्टीच्या फॉरमॅट मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर आणि आंद्रे रसेल यांना देखील आकाश चोप्राने आपल्या जागा दिलेली नाही. तर, ऍरॉन फिंच आणि रोहित शर्मा यांना आणि रोहित शर्मा सलामीवीर म्हणून आपल्या या संघात स्थान दिलेले आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीला आकाश चोप्राने तिसर्‍या क्रमांकावर संघात स्थान दिले आहे.  

AUSvsIND : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय विजयाची कहाणी

याव्यतिरिक्त, आकाश चोप्राने आपल्या संघात अष्टपैलू खेळाडूंची जोरदार निवड केली आहे. साकिब अल हसन, केरॉन पोलार्ड, ग्लेन मॅक्सवेल आणि राशिद खान यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंना त्याने आपल्या संघात स्थान दिले आहे. तसेच दशकातील टी -ट्वेन्टीच्या प्लेयिंग इलेव्हन मध्ये त्याने जोस बटलरला घेतले असून, त्याच्यासोबतच गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि मिचेल स्टार्चरचा संघात समावेश केला आहे. टी -ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त बळी टिपणारा लसिथ मलिंगा हा एकमेव गोलंदाज आहे. व त्याच्याच नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने 2014 मध्ये प्रथमच बांगलादेशमध्ये टी -ट्वेन्टी  विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आकाश चोप्राने लसिथ मलिंगाला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. 

आकाश चोप्राने निवड केलेली दशकातील सर्वोत्कृष्ट टी -ट्वेन्टी इलेव्हन टीम - 
रोहित शर्मा, ऍरॉन फिंच, विराट कोहली, साकिब अल हसन, जोस बेटलर (विकेटकिपर), केरॉन पोलार्ड, ग्लेन मॅक्सवेल, राशिद खान, लसिथ मलिंगा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क.             

    


​ ​

संबंधित बातम्या