झेल घेण्याच्या प्रयत्नात फाफ - मोहम्मदची टक्कर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 June 2021

उंच झेल घेण्याच्या प्रयत्नात फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद हासनेन यांची टक्कर झाली. त्यात प्लेसीसला दुखापत झाली. पाकिस्तान प्रीमियर लीगमधील या सामन्यात त्याला बदलणे क्वेट्टा ग्लॅडिएटर्सला भाग पडले.

अबूधाबी - उंच झेल घेण्याच्या प्रयत्नात फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद हासनेन यांची टक्कर झाली. त्यात प्लेसीसला दुखापत झाली. पाकिस्तान प्रीमियर लीगमधील या सामन्यात त्याला बदलणे क्वेट्टा ग्लॅडिएटर्सला भाग पडले.

मोहम्मद नवाझचा चेंडू डेव्हिड मिलरने समोर उंचावरून मारला. लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करणारा डू प्लेसिस आणि लाँग ऑफला असलेला हासनेन हे चेंडू रोखण्यासाठी धावले. फाफसह टक्कर होणार हे ओळखून हासनेन बाजूला गेला; पण तो पूर्ण बाजूला होण्यापूर्वीच त्याची आणि फाफची टक्कर झाली. चेंडू रोखण्यासाठी झेपावलेल्या फाफचे डोके हासनेनच्या गुडघ्यावर लागले.

फाफ डोके धरून कळवळला. काही वेळ तो काही हालचाल करीत नव्हता. त्याच्यावर मैदानावर उपचार करण्या आले. तो सहकाऱ्यांच्या मदतीने मैदानाबाहेर आला. त्याला तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या