पदार्पणाच्या सामन्यातच जेकॉब डफी चमकला; न्यूझीलंडचा पाकिस्तानवर विजय  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानवर 1 - 0 ने बढत मिळवली आहे. न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार शादाब खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित 20 षटकात नऊ गडी गमावत 153 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल यजमान न्यूझीलंड संघाने 18.5 षटकात 5 गडी गमावून हे लक्ष्य साध्य गाठले. 

बोल्ड झाला पृथ्वी आणि ट्रोल झाले शास्त्री;  जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड!

पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या जेकॉब डफीने चांगलेच धक्के दिले. जेकॉब डफीने आजच्या सामन्यात 33 धावा देऊन चार बळी टिपले. आणि त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाला आजच्या सामन्यात विजय मिळवता आला. जेकॉब डफीने पाकिस्तानच्या सलामी फळीचा अक्षरशः धुव्वा उडवल्याचे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. त्याने सलामीच्या फलंदाजांना बाद केल्यामुळे पाकिस्तानच्या संघाची स्थिती एका वेळेस 39 धावांवर पाच बाद अशी झाली होती. मात्र त्यानंतर शादाब खान आणि फहीम अश्रफ यांनी केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानचा संघ 153 धावांपर्यंत मजल मारू शकला. 

त्यानंतर पाकिस्तानने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरवात देखील अडखळत झाली. सलामीवीर मार्टिन गप्टिलला शाहीन आफ्रिदीने तंबूत धाडले. त्यानंतर क्रिझवर आलेल्या कॉन्वेयला हॅरिस अवघ्या पाच धावांवर बाद केले. मात्र यानंतर सलामीवीर टीम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी भागीदारी करून डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण फिलिप्सला देखील हॅरिसने परत पाठवले. मार्क चॅपमन आणि टीम सेफर्ट यांनी धावफलक पुढे नेला. टीम सेफर्टने यावेळी कारकिर्दीतील चौथे टी-ट्वेन्टी अर्धशतक झळकावले. परंतु तो 57 धावांवर असताना शाहीन आफ्रिदीने त्याला फहीम अश्रफ करवी झेलबाद केले. 

AUSvsIND : शमीनं फाटलेला शूज घालण्यामागचं कारण माहितेय का?

टीम सेफर्ट नंतर मार्क चॅपमन देखील 34 धावांवर आऊट झाला. मात्र तोपर्यंत सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकू लागला होता. यानंतर जेम्स निशम (15) आणि मिचेल सॅटनरने (12) न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स हॅरिसने घेतले. त्याने तीन बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदीने दोन विकेट्स घेतल्या. आणि न्यूझीलंडकडून जेकॉब डफीने चार विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. याशिवाय स्कॉटने तीन आणि सोधी व ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.        


​ ​

संबंधित बातम्या