भारतीय महिलांनी वर्चस्व गमावले
भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी तसेच गोलंदाजीत चांगली सुरुवात केली, पण अखेरच्या २० षटकांत वर्चस्व गमावल्याने भारतास हार पत्करावी लागली.
ब्रिस्टॉल - भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी तसेच गोलंदाजीत चांगली सुरुवात केली, पण अखेरच्या २० षटकांत वर्चस्व गमावल्याने भारतास हार पत्करावी लागली.
शेफाली वर्मा, मिताली राजमुळे भारताने २२१ ची मजल मारली, पण ३ बाद १४५ वरून डाव घसरल्याचा फटका भारतास बसला. भारताने इंग्लंडची अवस्था चार बाद ९२ केली होती, पण सोफिया डंकली हिने इंग्लंडला विजयपथावर नेले. धोकादायक ठरू शकणाऱ्या भारतीय फिरकीवर डंकलीने वर्चस्व मिळवत विजय सुकर केला.
संक्षिप्त धावफलक - भारतीय महिला - ५० षटकांत २२१ (स्मृती मानधना २२- ३० चेंडूत ३ चौकार, शेफाली वर्मा ४४- ५५ चेंडूत ७ चौकार, जेमिमा रॉड्रिग्ज ८, मिताली राज ५९- ९२ चेंडूत ७ चौकार, हरमनप्रीत कौर १९, झूलन गोस्वामी नाबाद १९- १९ चेंडूत ३ चौकार, अवांतर २६, सोफिया एक्लस्टोन ३३-३, केट क्रॉस १०-०-३४-५) पराजित वि. इंग्लंड महिला - ४७.३ षटकांत ५ बाद २२५ (लॉरेन विनफिल्ड- हिल ४२, अॅमी जोन्स २८, सोफिया डंकली नाबाद ७३ ८१ चेंडूत ५ चौकार व १ षटकार, कॅथरीन ब्रंट नाबाद ३३- ४६ चेंडूत ३ चौकार, झूलन गोस्वामी ३९-१, शिखा पांडे ३४-१, पूनम यादव १०-०-६३-२).
एकदिवसीय सामन्यात विजयासाठी किमान अडीचशे धावांची गरज असते. गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून आव्हान निर्माण केले, पण इंग्लंडच्या फलंदाजांनी खरंच चांगली खेळी केली.
- हरमनप्रीत कौर