कोरोनामुळे स्थगित झालेला इंग्लंडचा श्रीलंका दौरा ठरला  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

इंग्लंडचा संघ नवीन वर्षात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

इंग्लंडचा संघ नवीन वर्षात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात मार्च मध्ये होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता या सामन्यांची मालिका जानेवारी 2021 मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आज जाहीर केले आहे. 

AUSvsIND : कोहलीचा ऑस्ट्रेलियात डंका; नावावर झाले 'विराट' रेकॉर्डस्   

इंग्लंडचा संघ यावर्षी मार्च महिन्यात श्रीलंकेच्या भूमीवर जाऊन दोन कसोटी सामने खेळणार होता. मात्र कोरोनाच्या आकस्मिक संकटानंतर ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता ही दोन कसोटी सामन्यांची मालिका नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय हे दोन्ही सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहेत. 

दरम्यान, नुकतेच इंग्लंड संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळांनी केली होती. इंग्लंडच्या संघातील दोन सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. केपटाऊनमधील हॉटेलमध्ये जिथे हे दोन संघ वास्तव्यास होते त्याठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र सगळ्यात आधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूच्या कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. 


​ ​

संबंधित बातम्या