माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थानातील सोनवाल येथे मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारचा अपघात झाला असून, या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
AUSvsIND 3rd Test : टीम इंडिया सावधान! वॉर्नर कमबॅक करतोय
मोहम्मद अझरुद्दीन यांचे सहाय्यक यांनी याबाबत बोलताना, अपघातात कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळेस मोहम्मद अझरुद्दीन हे कार मध्ये होते. मात्र त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सहाय्यक कर्मचाऱ्याने सांगितले आहे. तर अपघातात कारच्या डाव्या साईडचा भाग चक्काचूर झाला आहे
Former Cricketer Mohammad Azharuddin's car met with an accident in Soorwal, Rajasthan earlier today.
He is unhurt, as per his personal assistant. pic.twitter.com/3hpKRNMMYm
— ANI (@ANI) December 30, 2020
दरम्यान, हम्मद अझरुद्दीन (वय 57) यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे. आणि सध्या ते हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. तर 2009 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन हे मुरादाबाद लोकसभेवर खासदार होते. तसेच बरेच वर्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.