युसूफनंतर सचिन तेंडुलकरच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोना

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 28 March 2021

सचिन आणि युसूफ पठाण यांच्यासोबत इंडिया लिजेंड्स संघात खेळलेल्या एस बद्रिनाथला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत खेळणाऱ्या आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इंडिया लिजेंड्स संघाचे नेतृत्व केले होते. रायपूरहून मुंबईला परतल्यानंतर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. सचिनने खुद्द ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती. होम क्वारंटाईन असल्याचे सांगत त्याने संपर्कात आलेल्या अन्य सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले होते.

त्याच्या पाठोपाठ रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये अष्टपैलू कामगिरी करुन मालिकावीर ठरलेल्या युसूफ पठाणचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. सचिन आणि युसूफ पठाण यांच्यासोबत इंडिया लिजेंड्स संघात खेळलेल्या एस बद्रिनाथला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एस बद्रिनाथने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीय. 

IND vs ENG: विराटच्या नावे खास विक्रम, कॅप्टन कूल धोनी अजूनही उजवाच

त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, मी योग्य ती खबरदारी घेत होतो. तसेच वेळोवेळी ट्सेटही केल्या. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून सौम्य लक्षणं आहेत. प्रोटोकॉलचे पालन करत असून घरीच क्वारंटाईन झालो आहे. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, असा सल्ला बद्रिनाथने दिला आहे. इंडिया लिजेंड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेंड्सला पराभूत करत ट्रॉफी जिंकली हतोी. अंतिम सामन्यात इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह युवराज सिंगने महत्त्वपूर्ण खेळी केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या