हिटमॅनसोबत वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटरची बर्थडे दिवशी निवृत्ती
2006 च्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने 6 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता.
भारतीय स्थानिक क्रिकेटमधील चेहरा असलेल्या आणि 19 वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या क्रिकेटर यो महेशने (Yo Mahesh) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. 2006 मध्ये त्याने 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. यावेळी याने संध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष ओळख असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत ड्रेसिंगरुम शेअर केली होती.
महेशने 50 फर्स्ट क्लास, 61 लिस्ट ए आणि 46 टी-20 सामने खेळले आहेत. 19 वर्षाखालील विश्वचषकानंतर त्याचे करियर हे स्थानिक क्रिकेटपुरतेच मर्यादित राहिले. आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली डेयरडेविल्सच्या संघाचेही प्रतिनिधीत्व केले. आयपीएलशिवाय महेशने तमिलनाडु प्रीमियर लीग (TNPL) मध्येही झळकला होता. आयपीएलमध्ये त्याने 18 सामन्यात 21 विकेट घेतल्या. पण सातत्याने होणाऱ्या दुखापतीमुळे त्याला करियरला विशेष उंची देण्यात अपयश आले.
''शमीच्या दुखापतीनंतर ईशांतच्या फिटनेससाठी BCCI ने रिव्ह्वू घ्यावा''
2006 च्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने 6 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता. यास्पर्धेत पियुष चावलाने महेशपेक्षा दोन विकेट अधिक घेतल्या होत्या. आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याने लक्षवेधी खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. दिल्ली जेयरजेविल्सकडून खेळता४ना त्याने 16 विकेट्स मिळवल्या होत्या. 19 वर्षांखालील संघात मिळालेली संधी, इंडिया अ संघातील प्रतिनिधीत्व करणे गौरवास्पद असल्याचे सांगत त्याने बीसीसीआयचेही आभार मानले आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 253 विकेटसह 1000 पेक्षा अधिक धावा आहेत.