"कामगिरी अशीच राहिली तर पाकिस्तानला कोण खेळायला बोलवणारच नाही"

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा व्हाईट वॉश केला आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा व्हाईट वॉश केला आहे. न्यूझीलंड सोबत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला एक डाव आणि 176 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर संघाच्या माजी खेळाडूंनी चांगलीच टीका केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर बोलताना, पाकिस्तानचा संघ अशाच प्रकारे कसोटी सामने गमावत राहिला तर जगातील इतर क्रिकेट संघ पाकिस्तानला कसोटी सामने खेळण्याचे आमंत्रण देणार नाहीत, असे म्हटले आहे. 

AusvsInd : सिडनीच्या मैदानात आतापर्यंत कोण ठरलंय भारी; जाणून घ्या रेकॉर्ड

न्यूझीलंड सोबत झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. आणि त्यामुळे पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संघाच्या खेळीवर संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानचा सध्याचा क्रिकेट संघ जेव्हा जेव्हा परदेश दौर्‍यावर जातो तेव्हा खराब कामगिरी करत असल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे. याशिवाय न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने अतिशय खराब कामगिरी केली असल्याचे रावळपिंडी एक्प्रेसने म्हटले आहे. तर केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील किवींच्या संघाने दमदार खेळी केल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे शोएब अख्तरने सांगितले. 

याशिवाय, पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवास कोण जबाबदार असल्याचा प्रश्न देखील शोएब अख्तरने उपस्थित केला आहे. तसेच या दोन्ही सामन्यातील दारुण पराभवास पाकिस्तानचा क्रिकेट संघ, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, मीडिया अथवा निवड समिती जबाबदार असल्याचा सवाल त्याने विचारत, का 2005 पासून बचावात्मक खेळण्याची मानसिकताच जबाबदार असल्याचे शोएब अख्तरने विचारले आहे. आणि पाकिस्तान संघाच्या अशा खेळीमुळे एकेकाळी बलाढ्य असलेला हा संघ नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे त्याने पुढे म्हटले आहे. व कदाचित भविष्यात जगातील इतर क्रिकेट संघ पाकिस्तानला कसोटी सामने खेळण्यासाठी आमंत्रण देण्याचे बंद करतील अशी भीती वाटत असल्याचे शोएब अख्तर म्हणाला. 

सिडनी कसोटीत इतिहास घडणार;  प्रथमच महिला अंपायरच्या भूमिकेत दिसणार 

दरम्यान, पाकिस्तान सोबतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाला किवींनी पहिल्या डावात 297 धावांवर रोखले होते. तर पहिल्या डावात केन विल्यम्सनच्या द्विशतकी आणि हेन्री निकोलस व डॅरेल मिचेल या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने 659 धावसंख्या उभारली होती. आणि पाकिस्तानच्या संघाला दुसऱ्या डावात 186 धावांवर सर्वबाद करत सामना जिंकला. याशिवाय पहिल्या सामन्यात देखील न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा 101 धावांनी पराभव केला होता.           


​ ​

संबंधित बातम्या