IPL ने CORONA वर केली मात; जाणून घ्या काय आहे नेमकी बातमी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

ब्राझील या देशात फुटबॉल हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याप्रमाणेच भारतात क्रिकेट हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे.

ब्राझील या देशात फुटबॉल हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याप्रमाणेच भारतात क्रिकेट हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. भारतात अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वचजण क्रिकेट या खेळालाच आपला आवडता खेळ म्हणून पसंती देतात. त्यामुळे जगभरात क्रिकेटचे सामने कोठेही होऊ देत, कोणतेही संघ असू देत, आणि कोठलेही खेळाडू सामन्यांमध्ये राहू देत, या सर्वांचेच चाहते भारतात आहेत. आणि कदाचित याच कारणामुळे भारतातील इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सारखी क्रिकेट स्पर्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकली आहे. आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे. 

तब्बल 14 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर 

क्रिकेट जगतातील खेळाडूंपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनाच आयपीएल ही स्पर्धा आवडते हे वेळोवेळी समोर आले आहे. क्रिकेटच्या विश्वातील अनेक खेळाडूंनी  आयपीएल मध्ये खेळण्याची इच्छा देखील अनेकदा बोलूनही दाखवलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे चाहते भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात आहेत. मात्र भारतात या स्पर्धेचे चाहते सर्वाधिक असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. कारण यंदाच्या वर्षात भारतात गुगलवर आयपीएल स्पर्धा कोरोना विषाणूपेक्षा अधिक ट्रेंडमधे राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गुगल इंडियाने आज जारी केलेल्या माहितीनुसार, संपूर्ण 2020 मध्ये भारतात टॉप सर्चिंग ट्रेंड हा कोरोना विषाणू नाहीतर आयपीएल राहिला असल्याचे म्हटले आहे. तर मागील वर्षी हाच ट्रेंड आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप होता असे गुगल इंडियाने नमूद केले. तसेच यावर्षी भारतात आयपीएल ही खेळातील सर्वात अधिक सर्च केलेली स्पर्धा असल्याचे गुगल इंडियाने सांगितले. आयपीएल नंतर कोरोना विषाणू, अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक आणि निकाल, बिहार निवडणूक असे इतर विषय टॉप ट्रेंड मध्ये होते. त्यामुळे जगभरासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले असले तरी, यंदाची आयपीएल स्पर्धा ही भारतीयांची मुख्य आवड राहिल्याचे कळते. 

कोरोनामुळे स्थगित झालेला इंग्लंडचा श्रीलंका दौरा ठरला  

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेची तेरावी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला होता. आणि त्यानंतर ही स्पर्धा कोरोनाजन्य परिस्थितीत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरच्या कालावधीत पार पडली. शिवाय दरवेळी पेक्षा सुमारे 28 टक्के अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली.                               


​ ​

संबंधित बातम्या