ग्रेग चॅपेल यांच्या एक्सायटिंग टेस्ट टीम मध्ये फक्त दोनच भारतीय; दिग्गजांना वगळले  

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

भारतीय संघाचे पूर्व प्रशिक्षक आणि आस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी मोस्ट एक्सायटिंग कसोटी संघाची निवड करताना भारतीय संघातील फक्त दोन खेळाडूंची निवड केली आहे.

भारतीय क्रिकेट मध्ये अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपले नाव इतिहासात कोरले आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी क्रिकेट विश्वात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे जगभरातील प्रतिभावान खेळाडूंची कसोटी लिस्ट करायची म्हटल्यास या संघात टीम इंडियातील कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अनिल कुंबळे, आर अश्विन, जसप्रीत बुमराह यांचा समावेश होऊ शकतो. मात्र भारतीय संघाचे पूर्व प्रशिक्षक आणि आस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी मोस्ट एक्सायटिंग कसोटी संघाची निवड करताना भारतीय संघातील फक्त दोन खेळाडूंची निवड केली आहे. 

AUSvsIND : फक्त एक विकेट दूर; सर जडेजाच्या नावावर होणार अनोखा विक्रम

टीम इंडियाचे कोच राहिलेले आणि आस्ट्रेलियन संघाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी नुकतेच कसोटीतील आपल्या मोस्ट एक्सायटिंग संघातील प्लेयिंग इलेव्हन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात ग्रेग चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियाच्या चार, वेस्ट इंडीज संघातील आणि भारतीय संघातील दोन व पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्यातील प्रत्येकी एक खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले आहे. आणि विशेष म्हणजे ग्रेग चॅपेल यांनी भारतीय संघातील फक्त दोन खेळाडूंची निवड चॅपेल यांनी आपल्या संघात केली आहे. वीरेंद्र सेहवाग व सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ग्रेग चॅपेल यांनी आपल्या संघात जागा दिली आहे. 

ग्रेग चॅपेल यांनी भारतीय संघातील वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीची निवड करताना टीम इंडियाच्या कसोटीतील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांचा सहभाग केला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वीरेंद्र सेहवाग हा कसोटीत देखील आक्रमक फलंदाजी करत असल्यामुळे सुरवातीला त्याला फक्त एकदिवसीय प्रकारातील फलंदाज म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यानंतर कसोटीत त्रिशतक झळकावल्यानंतर कसोटी फलंदाज म्हणून सेहवागने आपले स्थान पक्के केले. याशिवाय विराट कोहली सध्याच्या घडीला टी-ट्वेन्टी, एकदिवसीय आणि कसोटीतील उत्तम खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी कसोटी कारकिर्दीत आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे या दोघांचीही निवड  ग्रेग चॅपेल यांनी केलेली नाही. 

वेस्ट इंडीज संघातील व्हीव्हियन रिचर्ड्स आणि गॅरी सोबर्स या दोघांचीही निवड ग्रेग चॅपेल यांनी आपल्या संघात केलेली आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे ग्रीम पोलॉक, पाकिस्तान संघाचे स्विंग ऑफ सुलतान म्हणून ओळखले जाणारे वसीम अक्रम, आस्ट्रेलियाचे शेन वॉर्न, डेनिस लिली, जेप थॉमसन व ऍडम गिलख्रिस्ट या खेळाडूंचा समावेश ग्रेग चॅपेल यांनी आपल्या मोस्ट एक्सायटिंग टेस्ट टीम मध्ये केले आहे. 

 ग्रेग चॅपेल यांनी निवडलेली मोस्ट एक्सायटिंग टेस्ट टीम- 
व्हीव्हियन रिचर्ड्स, गॅरी सोबर्स,  ग्रीम पोलॉक, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, डेनिस लिली, जेप थॉमसन, ऍडम गिलख्रिस्ट, वसीम अक्रम, शेन वॉर्न, कोलिन मुनरो            

         


​ ​

संबंधित बातम्या