कमर्शियल विमान प्रवास नडला अन् कोरोना झाला : मोहम्मद हफिज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

कमर्शियल प्रवासादरम्यान काही खेळाडूंना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले होते. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य नव्हते. त्यामुळेच खेळाडूंना कोरोनाचा सामना करावा लागला, असे हफिजने म्हटले आहे. 

पाकिस्तान ते न्यूझीलंड दरम्यानचा तब्बल 24 तासांचा प्रवास करुन क्राइस्टचर्च येथे पोहचल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघातील 10 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. कमर्शियल विमानाने करावा लागलेला प्रवास आणि इकॉनॉमी क्लासमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन शक्य नसल्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचा दावा पाकिस्तानच्या संघातील वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हफिजने केला आहे.

इकॉनॉमी क्लासमध्ये कोरोना गाईड लाईनचे पालन झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  
न्यूझीलंड दौऱ्यावर पोहचल्यानंतर पाकिस्तानमधील 10 खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्याना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. न्यूझीलंडमधून मायदेशी परतल्यानंतर हफिजने प्रवासादरम्यान झालेली असुविधा बोलून दाखवली आहे.

Australian Open 2020 : फेडरर दुखापतीतून अजून सावरलेला नाही, स्पर्धेतून घेतली माघार

कमर्शियल प्रवासादरम्यान काही खेळाडूंना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले होते. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य नव्हते. त्यामुळेच खेळाडूंना कोरोनाचा सामना करावा लागला, असे हफिजने म्हटले आहे. खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) वर टीका झआली होती. न्यूझीलंड दौऱ्यावर 53 जणांचा ताफा पाठवण्यासाठी  चार्टर्ड विमानचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे संघातील खेळाडूंना कमर्शियल फ्लाइटने पाठवण्यात आल्याचे पीसीबीने म्हटले होते.   


​ ​

संबंधित बातम्या