लॉर्ड्सवर शंभर टक्के प्रेक्षकांना परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 July 2021

जगप्रसिद्ध लॉर्ड्स मैदान पुन्हा प्रेक्षकांच्या उपस्थितीने गजबजणार आहे. दोन वर्षांनंतर १० जुलै रोजी पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान एकदिवसीय सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगेल. ३० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या लॉर्डस््चा समावेश इंग्लंडने प्रेक्षकांसाठी मैदाने खुले करण्याच्या योजनेत केला आहे.

लंडन - जगप्रसिद्ध लॉर्ड्स मैदान पुन्हा प्रेक्षकांच्या उपस्थितीने गजबजणार आहे. दोन वर्षांनंतर १० जुलै रोजी पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान एकदिवसीय सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगेल. ३० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या लॉर्डस््चा समावेश इंग्लंडने प्रेक्षकांसाठी मैदाने खुले करण्याच्या योजनेत केला आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जगज्जेतेपद कसोटी १७ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाली होती; तर पाक - इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅम येथील लढत ८० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत होईल. ‘एजबस्टन मैदानावर ८० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना घेण्याबाबतच्या सूचना सरकारने केल्या आहेत. त्यामुळे १३ जुलै रोजी होणाऱ्या एजबस्टन सामन्यासाठी १९ हजार प्रेक्षक उपस्थित राहू शकतील. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांची काळजी घेण्यात येणार असल्याचे वॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्लबने म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या