महिला वर्ल्डकपची तारीख ठरली; जाणून घ्या भारतीय संघाचे वेळापत्रक

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2022 मध्ये खेळल्या जाणार्‍या महिला विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2022 मध्ये खेळल्या जाणार्‍या महिला विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसीने आज न्यूझीलंडमध्ये खेळवल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जारी केले. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या या वेळापत्रकानुसार टीम इंडिया या स्पर्धेत एकूण 7 लीग सामने खेळणार आहे. आणि भारतीय संघ आपला पहिला सामना 6 मार्च रोजी क्वालिफाय झालेल्या संघासोबत खेळणार आहे. 

दशकातील टी-ट्वेन्टी संघात धोनी नाही; आकाश चोप्राने निवडला अजब कॅप्टन     

आयसीसीने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार 2022 मध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आणि या स्पर्धेची उपांत्य फेरी वेलिंग्टन आणि ख्राइस्टचर्च येथे रंगणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामनादेखील येथेच खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ गट टप्प्यात एकूण सात सामने खेळणार आहे. त्यातील चार सामने मोठ्या संघांविरुद्ध होणार आहेत. यात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चार संघांचा समावेश आहे. तर उर्वरित तीन सामने क्वालिफाय होणाऱ्या संघाविरुद्ध पार पडणार आहेत. 

भारतीय संघाचा पहिला सामना 6 मार्चला क्वालिफाय झालेल्या पहिल्या संघासोबत होईल. यानंतर 10 मार्च रोजी टीम इंडियाचा सामना यजमान न्यूझीलंडशी संघाशी होईल. तर तिसरा सामना 12 मार्चला दुसऱ्या दुसऱ्या  क्वालिफाय झालेल्या संघासोबत होणार आहे. व 16 मार्च रोजी भारत इंग्लंडशी आणि 19 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल. यानंतर सहावा सामना 22 मार्च रोजी भारत तिसऱ्या क्वालिफाय संघाशी स्पर्धा करेल. सातव्या अखेरच्या लीग सामन्यात टीम इंडिया 27 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे.    


​ ​

संबंधित बातम्या