सॉरी बेन स्टोक्स; आयसीसीचे ट्विट होतंय व्हायरल  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 1 January 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वीच दशकातील आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली होती. आणि यातील एकदिवसीय व कसोटी संघात आयसीसीने इंग्लंड संघाचा खेळाडू बेन स्टोक्सचा समावेश केला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वीच दशकातील आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली होती. आणि यातील एकदिवसीय व कसोटी संघात आयसीसीने इंग्लंड संघाचा खेळाडू बेन स्टोक्सचा समावेश केला होता. त्यामुळे बेन स्टोक्सला दोन्ही संघात स्थान मिळाल्यानंतर आयसीसीकडून खास कॅप मिळाली होती. व या कॅपसह बेन स्टोक्सने आपला फोटो सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. व या पोस्टसह त्याने एक कमेंट केली होती. त्यानंतर आयसीसीने बेन स्टोक्सला रिप्लाय करत माफी मागितली आहे. 

क्रिकेटमधील ‘दादा’ राजकीय मैदानात?

यंदाचे वर्ष संपत असताना आयसीसीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचा गौरव केला होता. व त्याशिवाय आयसीसीने दशकातील आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा केली होती. ज्यात इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची निवड कसोटी आणि एकदिवसीय संघात केली होती. यानंतर बेन स्टोक्सला दोन्ही संघाची कॅप आयसीसी कडून मिळाल्या. यातील एकदिवसीय संघाची मिळालेली कॅप बेन स्टोक्सच्या पसंतीस उतरली. तर कसोटी संघाची कॅप त्याला फारकरून आवडली नाही. कारण या दोन्ही कॅप घालत बेन स्टोक्सने आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आणि त्यासोबतच त्याने या कॅप्सचा मला खूप अभिमान असल्याचे लिहीत, यातील कसोटी संघाची कॅप अजिबात आवडली नसल्याचे मजेत म्हटले. तसेच ही बॅगी आणि हिरव्या रंगाची कॅप असल्याचे म्हणत बेन स्टोक्सने आयसीसीला थँक यू देखील म्हटले आहे. 

बेन स्टोक्सने केलेल्या या मजेदार पोस्ट नंतर आयसीसीनेही त्याला मजेदार पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. आयसीसीने बेन स्टोक्सचा हा फोटो सोशल मीडियाच्या ट्विटरवर शेअर करतानाच मजेत सॉरी बेन स्टोक्स असे म्हटले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ben Stokes (@stokesy)

याव्यतिरिक्त, आयसीसीने भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली आणि आर अश्विन यांना कसोटी संघात स्थान दिले होते. तर एकदिवसीय संघात देखील रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आयसीसीने करत, या संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे दिले होते. यानंतर टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद देखील महेंद्र सिंग धोनीकडे सोपवत या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आयसीसीने केला होता.          


​ ​

संबंधित बातम्या