ICC Decade Team: दशकातील भारी कॅप्टन धोनीच; विराटला मिळाला कसोटीचा ताज

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 27 December 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 संघाची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दशकातील कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 संघाची घोषणा केली आहे. आणि यात आयसीसीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला तिन्ही संघात स्थान दिले आहे. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 या तिन्ही संघात स्थान मिळवणारा विराट कोहली एकमेव खेळाडू ठरलेला आहे. त्याशिवाय आयसीसीने जारी केलेल्या कसोटी संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कसोटी संघात विराट कोहली आणि आर अश्विन यांना स्थान मिळाले आहे. आयसीसीने विराट कोहलीची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. 

आयसीसीने जाहीर केलेला दशकातील कसोटी संघ - 

अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

त्यानंतर आयसीसीने तीन भारतीय खेळाडूंना दशकाच्या एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांचा आयसीसीने एकदिवसीय संघात समावेश केलेला असून, या संघाची धुरा आयसीसीने महेंद्र सिंग धोनीकडे दिली आहे.       

आयसीसीने जाहीर केलेला दशकातील एकदिवसीय संघ - 
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, साकिब अल हसन, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.

एकदिवसीय संघानंतर आयसीसीने दशकातील टी-ट्वेन्टी संघ देखील जाहीर केलेला आहे. यात आयसीसीने चार भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आयसीसीने टी-ट्वेन्टी संघात केलेला आहे. आणि या संघाचे नेतृत्व देखील आयसीसीने महेंद्र सिंग धोनीकडे दिले आहे. 

आयसीसीने जाहीर केलेला दशकातील टी-ट्वेन्टी संघ - 
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), केरॉन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.  


​ ​

संबंधित बातम्या