ICC Latest T20 Rankings : ओपनिंगनंतर कोहलीनं रँकिगमध्येही घेतली केएल राहुलची जागा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 24 March 2021

विराट कोहलीने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमवारीत विराट कोहलीला फायदा झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधाराने आपल्या लाडक्या सहकाऱ्याची जागा घेतलीय. एका स्थानांनी सुधारणा करत कोहली चौथ्या स्थानावर पोहचला असून मालिकेतील फ्लॉपशोनंतर लोकेश राहुलची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. ज्या जागेवर विराट पोहचला आहे त्याजागेवर लोकेश राहुल विराजमान होता.  

विराट कोहलीने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीला खातेही उघडता आले नव्हते. पण त्यानंतर रनमशिन चांगलीच बरसली. बॅक टू बॅक अर्धशतकी खेळी करत कोहलीने मालिकावीराचा पुरस्कार पटकवला. पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन सामन्यात कोहलीने 70 + धावा केल्या. टी-20 मालिकेत असा पराक्रम करणारा विराट पहिला फलंदाजही ठरला होता.  

INDvsENG : वन-डे इन पुणे! सामना दिसला नसेल; पण क्रिकेट प्रेम पुन्हा दिसलं

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत अर्धशतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलला टी-20 मालिकेत नावाला साजेसा खेळ करता आला नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत त्याला 4 सामन्यात संधी मिळाली. पण त्याला मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयश आले. अखेरच्या सामन्यात त्याला बाकावर बसवून विराट कोहली स्वत: ओपनिंगला आल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माच्या साथीनं त्याने भारतीय डावाला सुरुवात केली होती. या सामन्यानंतर आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहितसोबत ओपनिंग करण्याचे संकेत देत लोकेश राहुलची जागा घेण्याचे संकेत कोहलीने दिले होते. ओपनिंगच्या त्याच्या जागेवर कब्जा केल्यानंतर आता आयसीसी रँकिंगमध्ये कोहलीने केएल राहुलची जागा घेतली आहे.  

जोकोविचसोबत फ्लर्ट कर 51 लाख देतो; प्रसिद्ध मॉडेलला मिळाली होती ऑफर

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये इंग्लंडच्या डेविड मलानने अव्वलस्थान कायम राखले आहे. त्याच्या नावे 892 गुण आहेत. एरॉन फिंच 830 गुणांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा बाबर आझम 801 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली (762), लोकेश राहुल (743) या दोन भारतीयांचा पाचमध्ये समावेश आहे. आयसीसीच्या टी20 गोलंदाजी रँकिंगमध्ये एकाही भारतीयाला पहिल्या दहामध्ये स्थान नाही. दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी 733 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलुंच्या यादीतही टॉप टेनमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वलस्थानी आहे.


​ ​

संबंधित बातम्या