ICC Twitter Poll: विराट-इम्रान खान यांच्यात रंगली चुरशीची लढत; जाणून घ्या कुणी मारली बाजी
या पोलमध्ये एकूण 536,346 वोट पडली. इम्रान खान आणि विराट कोहली यांच्यात जोराची चुरस झाली. इमरान खान यांना 47.3 टक्के मते पडली तर कोहलीच्या बाजूने 46.2 टक्के मते पडल्याचे पाहायला मिळाले. डिव्हिलियर्सला केवळ 6 टक्के तर लॅनिंगला अवघी 0.5 टक्के इतकेच मतदान झाले.
ICC Twitter Poll: पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) आणि भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. इम्रान खान यांना त्यांच्या जमान्यातील उत्कृष्ट अष्टपैलू आणि कर्णधार तर विराट सध्याच्या जमान्यातील सर्वोत्तम फलंदाज आणि नेतृत्वाने लक्षवेधून घेणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (ICC) अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक पोल घेतला होता. संघाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कोणत्या खेळाडूची वैयक्तिक कामगिरी अधिक सुधारली? असा प्रश्न आयसीसीने विचारला होता. आयसीसीने यासाठी चार पर्याय दिले होते. यात इम्रान खान, विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्यासह महिला क्रिकेटर मेग लेनिंग यांच्या नावाचा समावेश होता.
Captaincy proved a blessing for some extraordinary cricketers
Their averages improved as leaders
You decide which of these ‘pacesetters’ were the best among these geniuses! pic.twitter.com/yWEp4WgMun
— ICC (@ICC) January 12, 2021
या पोलमध्ये एकूण 536,346 वोट पडली. इम्रान खान आणि विराट कोहली यांच्यात जोराची चुरस झाली. इमरान खान यांना 47.3 टक्के मते पडली तर कोहलीच्या बाजूने 46.2 टक्के मते पडल्याचे पाहायला मिळाले. डिव्हिलियर्सला केवळ 6 टक्के तर लॅनिंगला अवघी 0.5 टक्के इतकेच मतदान झाले.
वनडेत संघाचे नेतृत्व करताना कोहलीची फलंदाजीमधील सरासरी 73.88 इतकी आहे. ज्यावेळी त्याच्याकडे कर्णधारपद नव्हेत तेव्हा त्याने 51 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कॅप्टन झाल्यापासून त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे. दुसरीकडे इम्रान खान यांनी 1992 मध्ये पाकिस्तानी संघाला विश्वविजेता बनवण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. कर्णधाराची धूरा सांभाळताना इम्रान यांचे गोलंदाजीमधील सरासरी 20.26 वरुन 52.34 वर पोहचल्याची नोंद आहे. त्यांनी संघाला विश्वचषक जिंकून दिला त्यामुळे विराटपेक्षा त्यांना अधिक पसंती मिळाल्याचे दिसते.
सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळे तर्क देखील लढवण्यात येत आहेत. मोदींच्या विरोधकांनी इम्रान यांना मतदान केल्यामुळे विराट पराभूत झाला असा सूरही उमटल्याचे पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदान गाजवणारे इम्रान खान सध्या पाकिस्तानचे वजिरे आजम आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावर आणि मोदी विरोध याचा संदर्भात आयसीसीच्या पोलवर परिणाम करणारा आहे, असे काहींचे मत आहे.