U 19 वर्ल्ड कप पात्रतेसाठीचा कार्यक्रम ठरला, 5 जागेसाठी 33 टीम उतरणार मैदानात
मागील विश्वचषक स्पर्धेतील आघाडीचे 11 संघ फिक्स आहेत. यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या संघाचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (ICC) 2022 मध्ये नियोजित असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. 5 स्थानासाठी 33 संघात सामने रंगणार असून आयसीसीने यासंदर्भातील कार्यक्रमाची घोषणा केली आहे. 19 वर्षांखालील 14 व्या हंगामातील विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये रंगणार आहे.
मागील विश्वचषक स्पर्धेतील आघाडीचे 11 संघ फिक्स आहेत. यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या संघाचा समावेश आहे.
Inspiring Story : स्वप्न सत्यात येतं तेव्हा...
2021 मध्ये सुरु होणाऱ्या सात विभागीय स्पर्धेतून 33 संघांची निवड करण्यात येणार आहे. अफ्रिका आणि आशिया खंडात सर्वाधिक टीम असल्यामुळे या विभागातील संघाची निवड दोन गटातून केली जाईल. अमेरिका, ईएपी आणि युरोप या तीन विभागांचा एक वेगळा गट निर्माण करण्यात येणार आहे.