ICC T20 Ranking: विराटची प्रगती; तर न्यूझीलंडचे सेफर्ट व साउदी यांची गरुड झेप

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच जाहीर केलेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी फलंदाजांच्या रँकिंग मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रगती करत सातवे स्थान प्राप्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच जाहीर केलेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी फलंदाजांच्या रँकिंग मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रगती करत सातवे स्थान प्राप्त केले आहे. तर केएल राहुल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत दमदार खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या टीम सेफर्ट आणि टीम साउदी यांनी क्रमवारीत चांगलीच झेप घेतली आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी रँकिंगच्या ताज्या क्रमवारीत टीम सेफर्ट आणि टीम साउदी यांनी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत सेफर्ट 9 व्या स्थानावर आणि गोलंदाजांच्या यादीत साउदी 13 व्या स्थानावर पोहचला आहे.      

''विराटच्या अनुपस्थितही भारतीय फलंदाजांना रोखणं हे मोठे आव्हान...

आयसीसीने आज जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टीतील फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंड संघाचा डेव्हिड मलान 915 अंकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर पाकिस्तान संघाचा बाबर आझम 820 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. व त्यानंतर भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल 816 गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा वॅन डर डुसेन पाचव्या क्रमांकावर आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आठव्या क्रमांकावरून सातव्या स्थानी पोहचला आहे. 

त्यानंतर पाकिस्तान संघासोबत झालेल्या टी-ट्वेन्टी मालिकेचा फायदा न्यूझीलंड संघातील टीम सेफर्टला झाला आहे. त्याने या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. संपूर्ण मालिकेत 176 धावा करणाऱ्या टीम सेफर्टने 24 स्थानांची झेप घेतली आहे. यापूर्वी 32 व्या स्थानावर असलेल्या टीम सेफर्टने टॉप टेन मध्ये जागा मिळवत नवव्या स्थानी उडी घेतली आहे. टीम सेफर्टसह गोलंदाज टीम साउदीने देखील पाकिस्तान विरुद्धच्या या मालिकेत धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात 21 धावा देऊन चार बळी टिपले होते. व तसेच संपूर्ण मालिकेत त्याने सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आयसीसीच्या गोलंदाजांच्या यादीत टीम साउदीने सहा स्थानांची उडी घेत सातवे स्थान मिळवले आहे. 

पॅटर्निटी लिव्ह साठी कर्णधार विराट कोहली मायदेशी रवाना 

आयसीसीच्या टी-ट्वेन्टी गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान 736 अंकांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचाच  मुजिबूर रहमान या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. तर इंग्लंड संघाचा आदिल राशिद 700 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा ऍडम झम्पा आहे. व दक्षिण आफ्रिकेचा तरबेज शम्सी पाचव्या नंबरवर आहे.              


​ ​

संबंधित बातम्या