ICC Test Ranking : पॅटर्निटी लिव्हवरुन परतलेल्या केन विल्यमसला मिळाली गूड न्यूज

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 31 December 2020

विराट कोहली पॅटर्निटी लिव्हवर असून त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आयसीसी कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत स्मिथ आणि कोहलीला मागे टाकले आहे. आयसीसीने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या कसोटी क्रमावारीत केन विलियमसन पहिल्या स्थानावर आहे. पॅटर्निटी लिव्हवरुन परतलेल्या केन विल्यमसनने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 101 धावांनी पराभूत करत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.    

टीम इंडियाविरुद्धच्या ढिसाळ कामगिरीनंतर स्मिथ पहिल्या स्थानावरुन घसरुन तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात 877 गुण आहेत. विराट कोहलीनं 879 गुणासह दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. अव्वलस्थानी पोहचलेल्या केन विल्यम्सच्या नावे 890 गुण आहेत. पहिल्या पाचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन आणि पाकिस्तानच्या बाबर आझमचाही समावेश आहे. या दोघांच्या नावे अनुक्रमे 850 आणि 789 गुण आहेत. 

NZvsPAK : पाकचा करामती कॅप्टन! न्यूझीलंडला खेळायला गेलाय की नाचायला?

विराट कोहली पॅटर्निटी लिव्हवर असून त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आयसीसी कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मेलबर्नच्या मैदानातील शतकी खेळीमुळे त्याने दहाव्या स्थानावरुन पाच स्थानांनी झेप घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बरोबरी केली होती. अजिंक्य रहाणेनं मेलबर्न कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 112 आणि दुसऱ्या डावात 27 धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.  

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजाने तिसरे स्थान कायम राखले आहे. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात 57 धावा केल्या होत्या. याशिवाय 3 विकेटही घेतल्या होत्या. त्याने जेसन होल्डरच्यामधील अंतर 7 अंकांनी कमी केले आहे. मेलबर्नच्या मैदाना पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे 76 (फलंदाजी क्रमवारी) आणि 77 (गोलंदाजी क्रमवारी) वे स्थान मिळवले आहे. गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यात 45 आणि नाबाद 35 धावांची खेळी केली होती. तर सिराजने पाच विकेट मिळवल्या होत्या. 
 


​ ​

संबंधित बातम्या