विश्वकरंडक ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धा अमिरातीत घेण्यासाठी भारतीय मंडळावर वाढता दबाव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 June 2021

विश्वकरंडक ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धा अमिरातीत घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय मंडळावर चांगलेच दडपण आणले आहे. भारतास अंतिम निर्णयासाठी जूनअखेर मुदत दिली असली, तरी आयसीसीने अमिरातीत स्पर्धा घेण्याच्या दिशेने पूर्वतयारी सुरू केली असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत.

दुबई - विश्वकरंडक ट्वेंटी- २० क्रिकेट स्पर्धा अमिरातीत घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय मंडळावर चांगलेच दडपण आणले आहे. भारतास अंतिम निर्णयासाठी जूनअखेर मुदत दिली असली, तरी आयसीसीने अमिरातीत स्पर्धा घेण्याच्या दिशेने पूर्वतयारी सुरू केली असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मंडळाने आपल्या व्यवस्थापनास विश्वकरंडक ट्वेंटी २० क्रिकेट स्पर्धेच्या अमिरातीमधील संयोजनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. स्पर्धेच्या सुरळीत संयोजनासाठी मध्य पूर्व देशातील सहयजमान उपलब्ध होऊ शकतात का, याचाही विचार करण्याची सूचना केली आहे, असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले आहे. मात्र त्याच वेळी या स्पर्धेच्या संयोजनाबाबतचा अंतिम निर्णय या महिन्याच्या अखेरीस होईल, असेही सांगितले आहे. 

आगामी विश्वकरंडक ट्वेंटी- २० स्पर्धा कुठेही झाली, तर भारतीय क्रिकेट मंडळच त्या स्पर्धेचे यजमान असेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. स्थगित ठेवण्यात आलेल्या आयपीएलमधील उर्वरित लढती अमिरातीत होतील, हे भारतीय मंडळाने जाहीर केल्यानंतर दोन दिवसात आयसीसीने भारतातील विश्वकरंडक ट्वेंटी-२० स्पर्धा अमिरातीत होऊ शकते, याचे संकेत दिले आहेत. 

भारतीय क्रिकेट मंडळ स्पर्धा भारतात घेण्यासाठी आग्रही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेस हव्या असलेल्या करसवलतीबाबत तोडगा काढण्यासाठी केद्र सरकारला ९०० कोटी रुपये देण्याचीही भारतीय मंडळाची तयारी आहे. जागतिक क्रिकेटची आर्थिक सूत्रे भारताकडे आहेत. 

क्रिकेटपटूंचे वेगाने लसीकरण झाल्यास त्यांना जैवसुरक्षा वातावरणात राहताना मानसिक तणावास सामोरे जावे लागणार नाही. जगात सर्वत्र लसीकरण सुरू झाल्यावर जैवसुरक्षा वातावरणाची गरज भासणार नाही; मात्र त्याच वेळी खेळासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे ही आमची जबाबदारी असेल.
- जेप अॅलार्डाईस, आयसीसीचे प्रभारी कार्यकारीप्रमुख


​ ​

संबंधित बातम्या