भारतात येणार पाकिस्तानचा संघ; नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार फायनल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 April 2021

ind vs pak icc t20 world cup :  वर्षाअखेर भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी होण्याचा पाकिस्तान संघाचा मार्ग मोकळा झाला

ind vs pak icc t20 world cup : वर्षाअखेर भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सहभागी होण्याचा पाकिस्तान संघाचा मार्ग मोकळा झाला आहे.  ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयसीसीसीचा टी-20 विश्वचषक होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेले काही वर्षे राजकीय तणाव आहे. क्रिकेटच्या मैदानावरही त्याचा प्रत्यय आला. ICCच्या अधिकृत स्पर्धा वगळता भारताचा संघ पाकिस्तानशी क्रिकेट खेळत नाही. यंदा भारतात होणाऱ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने येऊ शकतो.  टी-20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणार आहे. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. हा टी-20 वर्ल्ड कप भारतात नऊ ठिकाणी होईल आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगेल, अशी माहितीही देण्यात आली आहे

टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता बंगळुरु, हैदराबाद, धरमशाला आणि लखनऊ या शहरांची निवड केली आहे. अंतिम सामना अर्थाच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 विश्वचषक होणार आहे.

2016 मध्येही ही स्पर्धा भारतात झाली होती. त्यावेळी सामने आयोजनाची संधी न मिळालेल्या अहमदाबाद, लखनऊ, चेन्नई आणि हैदराबाद यांना यंदा संधी मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे पाकिस्तानचा सहभाग निश्चित आहे आणि त्यासाठी त्यांच्या खेळाडूंना आणि संघातील सपोर्ट स्टाफलाही भारताचा व्हिसा देण्यात येईल, असे आश्वासन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले. 


​ ​

संबंधित बातम्या