INDvsAUS : धवनने शेअर केला खास फोटो ; असा असेल टीम इंडियाचा नवा लूक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

येत्या 27 तारखेपासून भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा कोरोनावर खबरदारी घेत खेळाडू मैदानावर उतरण्यास सुरवात झाली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झाले. या मालिकेनंतर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामने पार पडले. त्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ मैदानावर आमने-सामने उतरणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रत्येकी तीन सामन्यांची एकदिवसीय, टी 20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

INDvsAUS : सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान द्यायला हवे होते

येत्या 27 तारखेपासून भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यापासून भारतीय संघाच्या जर्सीत थोडाफार बदल करण्यात आलेला आहे. टीम इंडियाच्या किट स्पॉन्सर्समध्ये बदल झालेला आहे. एमपीएल या ब्रँडने टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरचा करार तीन वर्षासाठी केलेला आहे. त्यामुळे यापुढे  एमपीएलचा लोगो पुढील तीन वर्षासाठी टीम इंडियाच्या जर्सीवर दिसणार आहे. 

याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये भारतीय संघ नव्या रेट्रो जर्सीत मैदानावर उतरणार आहे. ही जर्सी भारतीय संघाचे खेळाडू 80 च्या दशकात परिधान करायचे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने या जर्सीचा फोटो सोशल मीडियावरील ट्विटरवर शेअर केला आहे. या जर्सीचा फोटो शेअर करताना धवनने नवीन जर्सी, नवी प्रेरणा असे कॅप्शन पोस्टला दिले आहे.           


​ ​

संबंधित बातम्या