भारत-न्यूझीलंडमधील विजेता १६ लाख डॉलरचा मानकरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 June 2021

कसोटी अजिंक्यपद लढतीतील भारत किंवा न्यूझीलंड यांच्यातील विजेता प्रतिष्ठा तर मिळवणार आहेच, पण त्याचबरोबर १६ लाख डॉलरचीही कमाई करणार आहे. सोबत विजेतेपदाची गदाही अभिमानाने मिरवणार आहे.

दुबई - कसोटी अजिंक्यपद लढतीतील भारत किंवा न्यूझीलंड यांच्यातील विजेता प्रतिष्ठा तर मिळवणार आहेच, पण त्याचबरोबर १६ लाख डॉलरचीही कमाई करणार आहे. सोबत विजेतेपदाची गदाही अभिमानाने मिरवणार आहे.

येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या बहुचर्चित सामन्याची बक्षीस रक्कम आयसीसीने जाहीर केली. उपविजेत्या संघाला आठ लाख डॉलर मिळतील. या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा संघ चार लाख ५० हजार, चौथ्या क्रमांकाचा संघ तीन लाख ५० हजार, पाचव्या क्रमांवरील संघ दोन लाख डॉलरचा मानकरी ठरेल. उर्वरित चार संघांना प्रत्येकी एक लाख डॉलर देण्यात येणार आहेत.

कसोटी अजिंक्यपदाची गदा याअगोदर कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अससेल्या संघाला देण्यात येत होती, यंदापासून अंतिम सामन्यातून विजेता संघ निश्चित होईल.


​ ​

संबंधित बातम्या