रवि शास्त्रींचा मोठा विजय; रोहित-विराटमधील वाद मिटवला!

सकाळ स्पोर्ट्स टीम
Tuesday, 30 March 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात एक आशादायी ट्युनिंग पाहायाला मिळाले. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर दिमाखदार विजय मिळवला. भारतीय संघाच्या विजयात पडद्यामागची भूमिका साकारणाऱ्या मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी या दौऱ्यात एक मोठ यश मिळवल्याची चर्चा जोर धरत आहे. रवि शास्त्री यांना मिळालेला विजय भारतीय संघाला आगामी स्पर्धेसाठी फायदेशीर असा आहे.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात एक आशादायी ट्युनिंग पाहायाला मिळाले. 

2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद चव्हाट्यावर आला होता. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जबरदस्त  ऑन स्‍क्रीन केमेस्‍ट्री पाहायला मिळाली. फिल्डिंगच्या वेळी विराट कोहली हिटमॅन रोहितचा सल्ला घेतानाही पाहायला मिळाले. खासकरुन हार्दिक पांड्या गोलंदाजीला असताना रोहित शर्मा त्याला समजावून सांगताना पाहायला मिळाले.  

‘बबल’चा येतोय उबग, जैव सुरक्षा वातावरणात किती काळ राहायचे?

टाइम्‍स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रवि शास्त्री यांनी दोघांच्यात निर्माण झालेली दरी भरुन काढण्यासाठी महत्त्वपूर्ण  भूमिका बजावली आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील विजयासह विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेद कमी झाले आहेत. मागील चार महिन्यांपासून ही जोडगोळी एकमेकांना अधिक समजून घेत आहे. याचा टीम इंडियाला फायदाच होईल, असा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आलाय.  

INDvs ENG : पहिल्यांदाच किंग कोहली- हिटमॅन रोहितसोबत ओपनिंगला

दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत अधिक वेळ घालवत असून छोट्या-छोट्या वाटणाऱ्या गोष्टींसंदर्भातही विराट मोकळेपणाने रोहितशी चर्चा करत आहे. ही गोष्ट संघाच्या हिताची असल्याचे दोघांनाही माहित आहे. दोघांच्यात पुन्हा दोस्ती फुलवण्यात रवि शास्त्रींनी मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे.  


​ ​

संबंधित बातम्या