हरमनप्रीतला कोरोना; लवकरच फिल्डवर परतण्याचा व्यक्त केला विश्वास

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 30 March 2021

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, यूसुफ पठाण, बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांच्यानंतर हरनप्रrत कौरचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  

भारतीय महिला टी 20 संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिचा कोविड 19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ती होम क्वारंटाईन असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिलांमध्ये  नुकतीच वनडे आणि टी-20 मालिका पार पडली होती. या स्पर्धेत ती सहभागी होती.   मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, यूसुफ पठाण, बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांच्यानंतर हरनप्रित कौरचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  

हरमनप्रीतने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून कोरोना नियमावलीनुसार होम क्वांरटाईन झाले आहे. प्रकृती ठिक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती खबरदारी घेत आहे. कोरोनातून सावरून लवकरच फिल्डवर परतेन, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.

17 मार्च रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अखेरचा वनडे सामना खेळवण्यात आला होता. वनडेतील सर्व सामने लखनऊच्या मैदानात खेळवण्यात आले होते. पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत हरमनप्रीतने  40, 36, 54 आणि नाबाद 30 धावांची खेळी केली होती. हरमनप्रीत कौरने  2 कसोटी, 104 वनडे  आणि 114 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिन्ही प्रकारात तिने अनुक्रमे 26 धावा आणि 9 विकेट, 2532 धावा आणि 25 विकेट, 2186 धावा आणि 29 विकेट मिळवल्या आहेत.  

इरफानही कोरोनाच्या जाळ्यात, इंग्लंड विरुद्धच्या वनडेत केली होती कॉमेंट्री

32 वर्षीय हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळली नव्हती. वनडेतील अखेरच्या सामन्यात तिला दुखापत झाली होती. तिच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनाने भारतीय महिला टी-20 संघाचे नेतृत्व केले होते.


​ ​

संबंधित बातम्या