एस श्रीशांत करणार कमबॅक; वाचा कोणत्या स्पर्धेतून दिसणार मैदानात 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. एस श्रीशांत आगामी स्थानिक स्पर्धा सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी  स्पर्धेतून खेळण्यास सुरवात करणार आहे. नवीन वर्षाच्या जानेवारीत महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एस श्रीशांत केरळ संघाकडून खेळणार आहे. श्रीशांतवर मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच श्रीशांत स्थानिक स्पर्धेतून मैदानात उतरणार आहे.  

AUSvsIND : गावस्करांनी सांगितले टीम इंडियाच्या विजयाचे रहस्य 

केरळ क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या केरळ संघाच्या खेळाडूंच्या यादीत एस श्रीशांतचे नाव आहे. 10 जानेवारीपासून केरळचा संघ मुंबईत सामने खेळणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी एस श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर या बंदीचा कालावधी कमी करून सात वर्ष करण्यात आला होता. आणि हा कालावधी यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपला. केरळ संघात समाविष्ट झाल्यानंतर श्रीशांतने सोशल मीडियावरील ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय श्रीशांतने व्हिडीओ पोस्ट करताना, संपलेल्या व्यक्तीने पुन्हा स्वतःला उभारी देणे याहून मोठे काही नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने याबद्दल आपल्या चाहत्यांचे देखील आभार मानले आहे.     

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केरळ संघाचे प्रतिनिधित्व संजू सॅमसन करणार आहे. तर सचिन बेबी हा या संघाचा उपकर्णधार असणार आहे. श्रीशांत, संजू सॅमसन आणि सचिन बेबी यांच्या व्यतिरिक्त बासिल थंपी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, विष्णू विनोद, सलमान निजार, निधेश आणि असिफ केएम हे केरळ संघाकडून खेळणार आहेत.      

 


​ ​

संबंधित बातम्या