भारतीय खेळाडू लंकेत वाजवणार डंका; LPL2020 मध्ये खेळणार चौघे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेनंतर आता श्रीलंकेत टी20 लीगचा थरार रंगणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेनंतर आता श्रीलंकेत टी-20 लीगचा थरार रंगणार आहे. भारत आणि इतर सर्व देशांप्रमाणेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील  टी -20 लीग स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने या लीग स्पर्धेला लंका प्रीमियर लीग (एलपीएल) असे नाव दिले आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम गुरुवारी 26 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आणि या टी -20 लीगमध्ये चार भारतीय खेळाडूही सहभागी होत आहेत. 

INDvsAUS : सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान द्यायला हवे होते

श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने 23 नोव्हेंबरला या लीग मध्ये खेळवण्यात येणाऱ्या पाच संघांची घोषणा केली होती. त्यानुसार गॅले ग्लॅडिएटर्स, जाफना स्टॅलियन्स, कँडी टस्कर्स, डम्बुला हॉक्स आणि कोलंबो किंग्सचे संघ सहभागी होत आहेत. आणि यात चार भारतीय खेळाडूंनाही तीन वेगवेगळ्या संघात स्थान मिळाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, मुनाफ पटेल, वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी आणि मनप्रीतसिंग गोनी यांचा समावेश आहे.

भारतीय संघातील हे चार खेळाडू श्रीलंकेतील लीग स्पर्धेत उतरणार असल्याचे श्रीलंका क्रिकेटने अधिकृतपणे जाहीर केले आहे.त्यांपैकी इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांना कँडी टस्कर्स संघात स्थान देण्यात आले आहे. ही टीम बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि वडील सलीम खान यांची आहे. त्याचवेळी सुदीप त्यागी डम्बुला हॉक्स संघाकडून मैदानात उतरणार आहे. तर मनप्रीतसिंग गोनी कोलंबोच्या संघाचा भाग असणार आहे. 

दरम्यान, श्रीलंकेत होणाऱ्या या लीगचा पहिला सामना 26 नोव्हेंबरला हंबनटोटा येथे खेळला जाईल. हा सामना कोलंबो किंग्स आणि कँडी टस्कर्स या दोन संघात खेळवण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 16 डिसेंबरला हंबनटोटा येथेच होईल. 

एलपीएल सामन्याचे वेळापत्रक - 

26 नोव्हेंबर - कोलंबो किंग्स वि. कँडी टस्कर्स

27 नोव्हेंबर - जाफना स्टॅलियन्स वि. गॅले ग्लॅडिएटर्स 

28 नोव्हेंबर - कँडी टस्कर्स वि. डम्बुला हॉक्स

28 नोव्हेंबर - गॅले ग्लॅडिएटर्स वि. कोलंबो किंग्स 

30 नोव्हेंबर - डम्बुला हॉक्स वि. जाफना स्टॅलियन्स

30 नोव्हेंबर - कँडी टस्कर्स वि. गॅले ग्लॅडिएटर्स 

1 डिसेंबर - कोलंबो किंग्स वि डम्बुला हॉक्स

1 डिसेंबर - जाफना स्टॅलियन्स वि. कँडी टस्कर्स

3 डिसेंबर - गॅले ग्लॅडिएटर्स वि. जाफना स्टॅलियन्स

3 डिसेंबर - डम्बुला हॉक्स वि. कँडी टस्कर्स

4 डिसेंबर - कोलंबो किंग्स विरुद्ध जाफना स्टॅलियन्स

5 डिसेंबर - डम्बुला हॉक्स वि. गॅले ग्लॅडिएटर्स

5 डिसेंबर - कँडी टस्कर्स वि. कोलंबो किंग्स 

7 डिसेंबर - कोलंबो किंग्स वि. गॅले ग्लॅडिएटर्स

7 डिसेंबर - डम्बुला हॉक्स वि. जाफना स्टॅलियन्स

9 डिसेंबर - कँडी टस्कर्स वि. जाफना स्टॅलियन्स

9 डिसेंबर - गॅले ग्लॅडिएटर्स वि. डम्बुला हॉक्स

10 डिसेंबर - जाफना स्टॅलियन्स वि. कोलंबो किंग्स 

10 डिसेंबर - गॅले ग्लॅडिएटर्स वि. कॅन्डी टस्कर्स

11 डिसेंबर - डम्बुला हॉक्स वि. कोलंबो किंग्स 

13 डिसेंबर - उपांत्य फेरी 1

14 डिसेंबर - उपांत्य फेरी 2

16 डिसेंबर - एलपीएल टी 20 अंतिम सामना       


​ ​

संबंधित बातम्या