इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीवर भारतीय संघाचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 June 2021

भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अंजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. केवळ तीन दिवसांच्या सरावानंतर भारतीय संघ हा सामना खेळणार आहे; मात्र त्याच वेळी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी खेळणार आहे.

लंडन - मे अखेपर्यंत आयपीएल असल्यामुळे साधारणतः स्थगित असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट उद्यापासून सुरू होत असते त्याप्रमाणे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरू होत आहे, परंतु हा सामना हा दोघांपेक्षा भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे संघ व्यवस्थापन प्रत्येक घडामोडी टिपून त्याचा अभ्यास करणार आहे.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अंजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. केवळ तीन दिवसांच्या सरावानंतर भारतीय संघ हा सामना खेळणार आहे; मात्र त्याच वेळी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी खेळणार आहे. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना निश्चित झाल्यावर लगेचच न्यूझीलंडने या मालिकेचे आयोजन केले होते.

ही मालिका पुढील वर्षाच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत येत नसल्यामुळे इंग्लंडनेही जॉस बटलर, बेन स्टोक्स अशा खेळाडूंना विश्रांती दिली आहे; मात्र जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडसारखे वेगवान गोलंदाज न्यूझीलंडसाठी भारी ठरू शकतात. न्यूझीलंडने मात्र अभ्यासपूर्वक खेळडूंची निवड केली आहे, त्यानुसार त्यांचा हुमकी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड इंग्लंडविरुद्ध खेळणार नाही.


​ ​

संबंधित बातम्या