"भारत-पाक 'मॅटर' ICC च्या आवाक्याबाहेरचा"

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील (आयसीसी) न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रतिनिधी ग्रेग बर्कले यांनी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संदर्भात महत्वाचे विधान केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील (आयसीसी) न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रतिनिधी ग्रेग बर्कले यांनी आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्याशी संपर्क करत या दोन्ही देशांना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात एकत्र आणण्यासाठी काम करणार असल्याचे ग्रेग बर्कले यांनी म्हटले आहे. 

INDvsAUS : विराट कोहलीचा आणखी एक विश्वविक्रम 

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील संबंधावर विचारलेल्या प्रश्नावर ग्रेग बर्कले यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील सामने पुन्हा सुरु करण्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र या दोन देशातील काही गोष्टी या क्रिकेट सोडून त्यापेक्षा वेगळ्या असल्याचे म्हटले आहे. पण आयसीसी या दोन्ही देशातील क्रिकेट पूर्ववत चालू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

याशिवाय, भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील क्रिकेटचे सामने व्हावे हे प्रत्येक क्रिकेटरसिकाला वाटते. जर पुन्हा हे दोन संघ मैदानावर खेळताना दिसले तर चाहत्यांसाठी ही पर्वणीच असेल. आणि माझ्यासाठी देखील यासारखी कोणतीही आनंदाची गोष्ट नसल्याचे ग्रेग बर्कले यांनी म्हटले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने हे नेहमीप्रमाणे त्यांच्या होम ग्राउंडवर खेळवण्यासाठी आयसीसीची मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

AUSvsIND : जाणून घ्या दुसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे

याव्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या प्रश्नावर सोडून आयसीसीकडे भारत-पाक द्विपक्षीय संबंधांवर प्रभाव टाकण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे  ग्रेग बर्कले यांनी सांगितले. त्यामुळे इतर गोष्टी सोडून क्रिकेटच्या मैदानावर हे दोन्ही देश पुन्हा एकत्र आल्यास हे सर्वांसाठीच आनंदाचे राहणार असल्याचे ते म्हणाले. व त्यासाठी आयसीसीकडून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे बर्कले यांनी अधोरेखित केले. 

दरम्यान, सध्याच्या घडीला दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा सोडून अन्य कोणत्याही स्पर्धेत समोरासमोर दिसत नाहीत.  


​ ​

संबंधित बातम्या