IPL 2021 : रात्रीच्या जमावबंदीचा मुंबईतील आयपीएलवर परिणाम होणार?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 March 2021

आम्ही त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. आमच्या या तयारीत सध्या तरी कोणताही बदल झलेला नाही, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. 

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे 8 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या मुंबईतील सामन्यांवर परिणाम होण्याची शक्‍यता बीसीसीआयकडून तपासण्यात येत आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात चेन्नईतून 9 एप्रिलला होत असून मुंबईतील सामने 10 एप्रिलपासून सुरू होत आहेत. राज्य सरकारने रविवारपासून रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला वानखेडे स्टेडियमवर सामने आयोजनासाठी परवानगी दिली आहे, आम्ही त्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. आमच्या या तयारीत सध्या तरी कोणताही बदल झलेला नाही, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. 

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर भगव्या लायनिंगची शायनिंग (VIDEO)​

प्रेक्षकांविना सामने
राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार रात्री 8 नंतर गर्दी करण्यास बंदी असणार आहे. आयपीएलचे सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू होऊन रात्री किमान 11 पर्यंत चालणार आहेत. प्रेक्षकांविना सामने होणार असल्याने तसा परिणाम होणार नाही, परंतु सामना संपल्यानंतर खेळाडूंना एकत्रितपणे स्टेडियमबाहेर पडण्यास साडे बारा वाजत असतात, त्यानंतर आयपीएल संयोजनाचा स्टाफ, ब्रॉडकास्टर क्‍य्रु, मैदानाची देखभाल करणारा स्टाफ स्टेडियमच्या बाहेर जात असतो. या सर्वांवर जमावबंदीचा परिणाम होणार का? याबाबत बीसीसीआय विचार करत आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या