टी-20 क्रिकेटमध्ये पठाणने रचला नवा विक्रम; आकडेवारी जडेजापेक्षाही भारी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 14 December 2020

भारताच्या रविंद्र जडेजाने टी 20 क्रिकेटमध्ये 150 विकेट आणि 2000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्याच्यानंतर असा पराक्रम करणारा इरफान पठाण भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे.

Irfan Pathan Made Record In T20 : भारतीय संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाण लंका प्रीमियर लीगच्या मैदानात उतरला आहे. या स्पर्धेत तो कँडी टस्कर्सचे प्रतिनिधीत्व करताना दिसतो. या स्पर्धेत अष्टपैलू इरफान पठाणने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 150 टी-20 विकेट आणि 2000 धावा करण्याचा पराक्रम करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले आहे. 

लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना स्टालियन संघा विरुद्धच्या सामन्यापूर्वी 2000 धावा करण्यासाठी पठाणला 16 धावांची आवश्यकता होती. या सामन्यात त्याने हा टप्पा पार करत टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला. त्याने 19 चेंडूत 25 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने असेला गुणरत्नेसोबत 52) धावांची भागीदार करत 151 धावांचे लक्ष्या पार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  इरफान प्रतिनिधीत्व करत असलेल्या टस्कर्स संघाचा स्पर्धेतील हा दुसरा विजय असून गुणतालिकेत त्यांचा संघ तळाला आहे.

AUS vs IND स्टार्कचा गुलाबी चेंडूवरील प्रभाव आणि जोश हेझलवूडचे आव्हान

यापूर्वी  भारताच्या रविंद्र जडेजाने 150 विकेट आणि 2000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्याच्यानंतर असा पराक्रम करणारा इरफान पठाण भारताचा दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे. रविंद्र जडेजाने 220 टी -20 सामन्यात हा पल्ला गाठला होता. इरफान पठाणने केवळ 180 सामन्यात हा टप्पा पार केला. आतापर्यंत  पठानने टी20 क्रिकेटमध्ये 2009 धावा आणि 173 विकेट्स घेतल्या आहेत.  जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असून तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातही आहे.  


​ ​

संबंधित बातम्या