"सुर्यकुमार-ईशान टी-20 वर्ल्डकपचे प्लेयर"

टीम सकाळ स्पोर्ट्स
Thursday, 25 March 2021

ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव या मुंबईच्या जोडगोळीने एकाच सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.

घरच्या मैदानावर रंगणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी चांगलीच रसीखेच पाहायला मिळणार आहे. आगामी वर्ल्ड कपसाठी कोणत्या युवा खेळाडूंना संधी मिळणार याचे चित्र स्पष्ट व्हायला अजून उशीर असला तरी वर्ल्ड कपसाठीच्या संभाव्य संघात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील दोन युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, असे मत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बोलून दाखवले आहे.

22 वर्षीय ईशान किशनने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारिकिर्दीला सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात ईशान किशनने 32 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्याच्यासोबत पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमारने चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यात 31 चेंडूत 57 आणि 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या खेळीनं लक्ष्मण प्रभावित झाले आहेत.  

Video : कॅप्टन कूलच्या हस्ते CSKची नवी जर्सी लाँच; आर्मीचाही सन्मान

स्टार स्पोर्ट्सवरील 'क्रिकेट कनेक्ट' या कार्यक्रमात लक्ष्मण यांना आगामी टी-20 वर्ल्डकपमधील संघनिवडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. सध्याच्या परिस्थिती या प्रश्नाच उत्तर देण कठिण असल्याचे लक्ष्मण यावेळी म्हणाले. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोन करुन दाखवलं आहे. ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव  आगामी वर्ल्ड कपसाठीच्या संभाव्य 15 मध्ये स्थान मिळण्याचे हकदार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.   

...म्हणून कृणाल पांड्या ड्रेसिंग रुममध्ये घेऊन आला होता वडिलांची कपडे

भारताचे माजी क्रिकेटर आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर देखील या कार्यक्रमात सहभागी होते. टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडीला अजून खूप वेळ आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन खेळाडूंना संघात स्थान मिळवण्याची नामी संधी असेल. भुवनेश्वर कुमारचे स्थान निश्चित असेल, असेही बंगार यावेळी म्हणाले.  


​ ​

संबंधित बातम्या