Video: बुमराह-संजनाच्या शानदार लग्नसोहळ्याची छोटीशी झलक

सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 16 March 2021

गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत बुमराह-संजना विवाहबद्ध पार पडला.

टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी विवाहबंधनात अडकला. स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्याशी त्याचा गोव्यात विवाहसोहळा पार पडला. जसप्रीत बुमराहने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नातील फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. बुमराहने इंग्लंडविरूद्धच्या शेवटच्या कसोटीतून आणि मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली होती. त्यावेळीच बुमराह लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चांना काल अधिकृतरित्या पूर्णविराम मिळाला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याचा एक छोटासा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ-

बुमराह आणि संजना हे दोघे एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत असतानाचा हा व्हिडीओ आहे. आधी बुमराहने संजनाच्या गळ्यात वरमाला घातला तर नंतर संजनाने बुमराहच्या गळ्यात हार घातला असा तो व्हिडीओ आहे. सोमवारी हा लग्नसोहळ्याचे केवळ फोटो व्हायरल झाले होते. पण लग्नाच्या व्हिडीओची झलक मात्र पहिल्यांदाच व्हायरल झाली. अगदी साधेपणाने हे लग्न पार पडले. लग्नासाठी निमंत्रण मिळालेल्या पाहुण्यांना सोबत येताना मोबाईल न बाळगण्याचा सल्ला देण्यात आला होता. या लग्नासाठी दोघांचे जवळचे नातेवाईक आणि अगदी मोजकेच पाहुणेमंडळी उपस्थित होते. बुमराहच्या लग्नानंतर त्याला शिखर धवन, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, सुरेश रैना आणि कुलदीप यादव यांच्यासह इतर भारतीय क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

बुमराह झाला महाराष्ट्राचा जावई, संजनानं केलं 'क्लीन बोल्ड'

संजना ही 2012 मध्ये 'स्प्लिट्सविला 7' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तेव्हा दुखापत झाल्यानं संजनाला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला होता. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेल होती. याशिवाय 'फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस' पुरस्कार तिने जिंकला आहे.  '2021 फेमिना स्टाईल दिवा' फॅशन शो मध्येही ती सहभागी झाली होती. संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. संजनाने 2019 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपवेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर मॅच पॉइंट आणि चीकी सिंगल्स हे कार्यक्रम केल होते. याशिवाय ती प्रीमिअर बॅडमिंटन लीगची होस्टसुद्धा होती.


​ ​

संबंधित बातम्या