बुमराह झाला महाराष्ट्राचा जावई, संजनानं केलं 'क्लीन बोल्ड'

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 15 March 2021

शिखर धवन, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, रैना आणि कुलदीप यादव यांच्यासह इतर भारतीय क्रिकेटपटूंनी बुमराहाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर विवाह बंधनात अडकला आहे. स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत मंगळवारी बुमराह लग्नाच्या बेडीत अडकला आहे. जसप्रीत बुमराह यानं इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो पोस्ट करत चाहत्यांनात आनंदाची बातमी दिली आहे. 

बुमराहनं इंग्लंडविरोधातील मर्यादित षटकांच्या सामन्यातून माघार घेतल्यानंतर लग्नाबाबतच्या चर्चेला उधाण आलं होतं. बुमराहनं बीसीसीआयकडं त्यासाठी परवानगी मागितली होती, आणि बुमराहला सुट्टीही मिळाली. आज, अगदी साधेपणानं हे लग्न पार पडले. लग्नासाठी निमंत्रण मिळालेल्या पाहुण्यांना सोबत मोबाईल न बाळगण्याचा सल्ला देण्यात आला. या लग्नासाठी दोघांचे जवळचे नातेवाईक आणि अगदी मोजकेच पाहुणेमंडळी उपस्थित होते.  

बुमराहची पत्नी संजना पुण्यातील सिंबायोसिस इंटरनॅशनल कॉलेजची विद्यार्थीनी आहे. त्यामुळे आता बुमराह महाराष्ट्राचा जावई झाला आहे. शिखर धवन, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, रैना आणि कुलदीप यादव यांच्यासह इतर भारतीय क्रिकेटपटूंनी बुमराहाला शुभेच्छा दिल्या आहेत. बुमराहने फोटो शेअर करताना म्हटलं की, “ खरं प्रेम तुमचं नशीब बदलतेच. प्रेमामुळेच आम्ही एकत्र आलो. आणि आता
आम्ही आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही विवाहबंधनात अडकलो, हे सांगताना आनंद होत आहे”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

कोण आहे संजना गणेशन 
2012 मध्ये संजना पहिल्यांदा स्प्लिट्सविला 7 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तेव्हा दुखापत झाल्यानं संजनाला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला होता. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेलही होती. याशिवाय 'फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस' पुरस्कार जिंकला आहे.  '2021 फेमिना स्टाईल दिवा' फॅशन शो मध्येही ती सहभागी झाली होती. संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. संजनाने 2019 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपवेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर मॅच पॉइंट आणि चिकी सिंगल्स हे कार्यक्रम केल होते. याशिवाय ती प्रीमिअर बॅडमिंटल लीगची होस्टसुद्धा होती. 


​ ​

संबंधित बातम्या