KKR ला गोलंदाजीचे धडे दिलेल्या दिग्गजावर भ्रष्टाचाराचा ठपका; ICC ने शिकवला चांगलाच धडा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 14 April 2021

2017 आणि 2018 मध्ये झालेल्या सामन्या दरम्यान प्रशिक्षकपदावर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांच्या यादीत आपला ठसा उमटवणारे  हिथ स्ट्रिक (Heath Streak Ban) यांच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केलीय. त्यांच्यावर 8 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाराच विरोधी नियमाचे उल्लंघन केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हिथ स्ट्रिक यांनी आयसीसीच्या भ्रष्टारविरोधी नियमावलीतील पाच नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. 

2017 आणि 2018 मध्ये झालेल्या सामन्या दरम्यान प्रशिक्षकपदावर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएलसह बांगलादेश आणि प्रिमियर लीगमधील सामन्यावेळी भ्रष्टाचार केल्याचा संशय बळवल्यानंतर त्यांची चौकशी सुरु होती. सुरुवातीच्या काळात आपल्यावरील आरोप फेटाळणाऱ्या हिथ स्टिक यांनी अखेर आपला गुन्हा कबूल केलाय. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने त्यांना 8 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. 

सॅमसन पुढच्या वेळी मोहीम फत्ते करेल - संगकारा

हिथ स्ट्रिक यांची कारकिर्द 

हिथ स्ट्रिक यांनी झिम्बाब्वेकडून 65 कसोटी सामने आणि 189 वनडे सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.  डावखुऱ्या स्विंग बॉलरने  कसोटीत 216 तर वनडेत 239  विकेट घेतल्या आहेत. स्ट्रिक यांच्या नावे कसोटीत 1990 आणि वनडेत 2942  धावांची नोंद आहे. 2005 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.  

हिथ स्ट्रीक यांचे कोचिंग कारकिर्द

हिथ स्ट्रिक यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वेगवेगळ्या संघाला प्रशिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली होती. झिम्बाब्वेशिवा. त्यांनी वेगवेगळ्या फ्रेंचायझी संघालाही कोचिंग केले. 2009 मध्ये हिथ स्ट्रिक यांनी झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांनी ग्रांट फ्लावर आणि एलेन बूचर यांच्यासोबत काम केले. 2013 मध्ये झिम्बाब्वे संघासोबतचा त्यांचा करार संपुष्टात आला. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डासोबत त्यांचे आर्थिक मुद्यावरुन मतभेदही झाले. 2014 ते 2016 दरम्यान त्यांनी झिम्बाब्वे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिल्यानंतर 2016 मध्ये त्यांच्याकडे संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. आयपीएलमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला गोलंदाजीचे धडे दिले होते.  


​ ​

संबंधित बातम्या